
नवी दिल्ली: भारत आणि चीन पुन्हा एकदा खोऱ्यात, तसेच गोगरा हॉट स्प्रिंगवर शांततेच्या मार्गाने मार्ग काढण्यावर सहमत झाले आहेत. दोन्ही देश लडाखमधील या भागातून हळूहळू आणि प्रामाणिकपणे आपापल्या सेना मागे घेणार आहेत. या पूर्वी देखील दोन्ही देशांदरम्यान झालेल्या सैन्य स्तरावरील चर्चेनंतर आपापले सैन्य मागे हटवण्यावर सहमती झाली होती. मात्र चीनी सैनिकांनी या सहमतीचे पालन न केल्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर १५ जूनला दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये हिंसक संघर्ष झाला होता. असे असले तरी या चर्चेदरम्यान पँगाँग सरोवर परिसराबाबत भारताला यश मिळू शकलेले नाही. या परिसराबाबत दोन्ही देशांदरम्यान असलेला पेच कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. येथे पीएलए (चीनी) सैनिकांचे मोठ्या संख्येने बंकर उभे आहेत. चीनी सैनिकांनी फिंगर ४ ते ८ पर्यंत आपला कब्जा केल्यानंतर येथील सर्वाच उंच शिखरावरही चीनी सैनिकांनी आपला कब्जा केला आहे. वाचा: बुधवारी अधिकृत सूत्रांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, दोन्ही पक्ष लवकरात लवकर हा तणाव दूर करण्याचा प्रयत्नात आहेत आणि येथून मागे हटण्यावर दोन्हीकडून सहमती दर्शवली गेली आहे. सैन्य स्तरावर १२ तास चाललेल्या या मॅरेथॉन बैठकीनंतर ६ जूननंतर झालेली ही दोन्ही देशांदरम्यानची तिसरी बैठक होती. या बैठकीत भारताकडून १४ कॉर्प्स कंमांडर लेफ्टनंट जनरल हरिंदरसिंह नेतृत्व करत होते. तर, चीनकडून दक्षिण शिनजियांग जिल्हा मुख्य मेजर जनरल लुई लिन या चर्चेत सहभागी झाले होते. वाचा: मात्र, ही एक दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. या चर्चेत अजूनही अनेक गोष्टींचा समावेश करण्यात यायचा आहे. या वेळी मात्र भारत चीन मागे हटतो की नाही यावर अतिशय सावधपणे लक्ष ठेवणार आहे. भारतीय भूमीत घुसखोरी केलेला चीन गलवान खोरे आणि हॉट स्प्रिंग क्षेत्रात असलेल्या पेट्रोलिंग पॉइंट (PP) १४, १५ आणि १७ अ पासून निघून जात आहे की नाही यावर भारताला लक्ष ठेवावे लागणार आहे. पँगाँग सो सरोवरच्या उत्तरेकडील किनाऱ्यावर असलेले हे शिखर सामरिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे मानले जाते. वाचा: