कानपूर: कानपूर पोलीस हत्याकांडातील मुख्य आरोपी गँगस्टर हा पोलीस चकमकीत मारला गेला आहे. एखाद्या चित्रपटात शोभेल असा त्याचा एन्काऊंटर झाला आहे. कानपूरमधील घटनेनंतर फरार असलेल्या विकास दुबेला काल रात्री येथे अटक करण्यात आली होती. (Gangster in Encounter) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केल्यानंतर विकास दुबेला एसटीएफच्या गाडीतून कानपूरला आणले जात होते. गाडी अत्यंत वेगात होती. बर्रा येथे अचानक रस्त्यात गाडी उलटली. या अपघातात दुबेसह काही पोलीस जखमी झाले. जखमी अवस्थेतही दुबे पळण्याची संधी शोधत होता. ही संधी मिळताच त्यानं एका पोलीस अधिकाऱ्याचं पिस्तूल हिसकावून पळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला इशारा दिला. मात्र तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यामुळं पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला. त्यात दुबे जागीच ठार झाला. विकास दुबेची अटकेचा क्षणही तितकाच थरारक होता. दुबेला उज्जैनच्या महाकाल मंदिरातून अटक करण्यात आली होती. रीतसर २५० रुपयांची पावती फाडून दर्शनासाठी तो मंदिरात पोहोचला होता. एका सुरक्षा रक्षकाला संशय आल्यानंतर त्यानं पोलिसांना ही माहिती दिली. पोलिसांनी उलटसुलट चौकशी करताच सगळी पोलखोल झाली. मात्र, त्याआधी दुबे बिनधास्त फोटोसेशन करत होता. अटक झाल्यानंतरही त्याला कुठलाही पश्चात्ताप झालेला दिसत नव्हता. गर्दीला पाहून 'मै विकास दुबे हू, कानपूरवाला' असं तो ओरडत होता. वाचा : वाचा :