कानपूर, : हत्याकांडातील मुख्य आरोपी हा पोलीस एन्काऊन्टरमध्ये ठार झालाय. कानपूरच्या लाला लाजपत राय रुग्णालयातील डॉक्टरांनी विकास दुबे याला मृत घोषित केलंय. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हिस्ट्रीशीटर विकास दुबे याला मध्य प्रदेशच्या उज्जैनहून कानपूरला आणण्यात येत होतं. यावेळी एसटीएफच्या गाड्यांच्या ताफ्यातील एका गाडीला अपघात झाला. याच गाडीत विकास दुबे बसला होता. अपघातानंतर विकास दुबेनं एसटीएफच्या एका अधिकाऱ्याच्या हातातला पिस्तुल हिसकावून घेतला आणि घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. वाचा : वाचा : वाचा : विकास दुबेनं पोलिसांवर गोळीबार केला. तो पळून जात असलेला पाहून पोलिसांनीही त्याच्यावर प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. या दरम्यान दुबे जखमी झाला आणि थोड्या वेळानं त्याचा मृत्यू झाला, असा दावा पोलिसांनी केलाय. या घटनेत चार पोलीस जखमी झाल्याची माहिती कानपूरचे पोलीस महानिरीक्षक मोहित अग्रवाल यांनी दिलीय. कानपूरमध्ये आठ पोलिसांच्या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि कुख्यात गँगस्टर विकास दुबे याला काल गुरुवारी सकाळी मध्य प्रदेशातील उज्जैन येथे अटक करण्यात आली होती.
विकास दुबेनं पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं होतं? कानपूरच्या बिकरू गावात आठ पोलिसांची गोळ्या घालून निर्घृण हत्या केल्यानंतर फरार झालेला गँगस्टर विकास दुबे यानं उज्जैनमध्ये पोलिसांसमोर स्वत: आत्मसमर्पण केल्याचीही माहिती समोर येत होती. त्यालाा पकडण्यासाठी पोलिसांनी अडीच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. इतकंच नव्हे तर त्याला पकडण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पोलिसांना एका आठवड्याचा अल्टिमेटम दिला होता. कानपूरमध्ये ८ पोलिसांची हत्या उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये गुन्हेगारांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर विकास दुबेच्या गुंडांनी गोळीबार केला होता. कानपूरमधील चौबैपूर पोलिस ठाणे क्षेत्रात पोलिसांचे हे पथक बिकरू या गावात ही घटना घडली होती. गुंडांनी केलेल्या गोळीबारात एका पोलिस उपअधीक्षकासह ८ पोलिस कर्मचारी शहीद झाले होते तर या हल्ल्यात इतर ७ पोलीस जखमी झाले होते. यावेळी गुंडांनी पोलिसांकडून एक एके ४७ रायफल, एक इन्सास रायफल, एक ग्लाक पिस्तूल तसंच दोन ९ एमएम पिस्तूल पळवली होती. वाचा : वाचा :