
पंढरपूरः दरवर्षी लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत अगदी उत्साहात साजरा केला जाणारा आषाढी एकादशीचा सोहळा यंदा मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला. आषाढी एकादशीची महापूजा यांनी सपत्नीक केली. यंदा मानाचे वारकरी म्हणून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पहारा देणाऱ्या पाथर्डी येथील वीणेकरी विठ्ठल ज्ञानदेव बडे यांना मान मिळाला. आषाढी एकादशीपासून करोनाचे संकट नष्ट होऊ दे, असे साकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी घातले. मुंबई : जागतिक बाजाराशी सुसंगत असूनही देशात आणि डिझेलच्या किमती जूनमधील तीन आठवडे वाढत होत्या. मात्र सोमवार आणि मंगळवार देशभरात झालेल्या आंदोलनाची दखल पेट्रोलियम कंपन्यांना घ्यावी लागली आहे. एकीकडे देश करोना संकटाशी झुंज देत असताना पेट्रोल-डिझेल दरवाढीने जनतेत निर्माण झालेला असंतोष शांत करण्यासाठी पेट्रोलियम मंत्रालयाकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यामुळेच आज बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी कंपन्यांनी दरवाढ टाळली आणि पेट्रोल-डिझेलचे दर जैसे थे ठेवले. मुंबई : स्थानिक कमॉडिटी बाजारात मंगळवारी झालेल्या नफावसुलीनंतर आज सोने आणि चांदीच्या किमतीत किंचित वाढ झाली आहे. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार आज सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ४८५५९ रुपये झाला. त्यात २५ रुपयांची वाढ झाली. तर चांदीमध्ये ४४ रुपयांची वाढ झाली असून प्रती किलो ४८६०० रुपये झाला. पंढरपूर: यात्रेच्या इतिहासात यंदा प्रथमच करोनामुळे आषाढ शुद्ध दशमीला नगरी वारकऱ्यांविना ओस पडल्याचं वेदनादायी चित्र पाहायला मिळालं. म्हटलं की ज्या मंदिर परिसरात यात्रेच्या आदल्या दिवसापासून मुंगी शिरायलाही जागा नसायची त्या संपूर्ण परिसरात मंगळवारी शुकशुकाट पसरला होता. नवी दिल्लीः फेमस शॉर्ट व्हिडिओ ला भारतात गुगल आणि अॅपल वरून हटवले आहे. गुगल आणि अॅपल ने हा निर्णय सूचना आणि प्रसारण मंत्रालयाच्या ५९ चायनीज अॅप्सवर बंदी घातल्यानंतर घेतला आहे. केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार, या अॅप्समुळे भारताची सुरक्षा आणि समाजाला धोका आहे. बंदी घालण्यात आलेल्या अॅप्समध्ये टिकटॉक शिवाय यूसी ब्राउजर, शेअरइट आणि कॅम्स स्कॅनर यासारख्या प्रसिद्ध अॅप्सचा समावेश आहे.