
मुंबई- प्रसिद्ध कोरिओग्राफर यांचं आज निधन झालं. श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे ते अनेक दिवसांपासून इस्पितळात भरती होत्या. गुरुवारी १ वाजून ५२ मिनिटांनी हृदयविकाराच्या धटक्याने त्यांचं निधन झालं. त्या ७२ वर्षांच्या होत्या. २० जून रोजी त्यांना गुरुनानक इस्पितळात नेण्यात आले होते. याआधी त्यांची करोना टेस्टही झाली होती. पण ती निगेटिव्ह आली होती. सरोज खान यांचं जाणं हे बॉलिवूडला झटका देणारं आहे. आज मालवणी, मालाड येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. कानपूर: उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये गुन्हेगारांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर गुंडांनी गोळीबार केला. यात एक पोलिस उपअधीक्षकासह ८ पोलिस कर्मचारी शहीद झाले आहेत. या हल्ल्यात इतर ७ पोलिस जखमी झाले आहेत. कानपूरमधील चौबैपूर पोलिस ठाणे क्षेत्रात पोलिसांचे हे पथक बिकरू या गावात विकास दुबे या गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेले होते. त्यावेळी ही घटना घडली. मुंबई : करोनाचे थैमान सुरु असले तरी अमेरिकेत रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात झाली आहे. मंदी आणि करोना व्हायरसने बेजार झालेली अमेरिकन अर्थव्यवस्था ह्ळुहळू पूर्वपदावर येत आहे. यामुळे गुरुवारी अमेरिकेतील शेअर बाजार उच्चांकी स्तरावर गेले. त्याशिवाय इतर प्रमुख देशांची आर्थिक स्थिती सुधारत असल्याने जागतिक पातळीवर सकारात्मक वातावरण दिसून आले. युरोपातील बहुतांश बाजार तेजीसह बंद झाले. मुंबई : इंधन दरवाढीला शुक्रवारी देखील लगाम बसला आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केला नाही. मात्र मागील तीन आठवड्यात झालेल्या दरवाढीचे परिणाम बाजारात दिसू लागले आहेत. माल वाहतूक महागल्याने बाजारात भाजीपाल्याच्या किमती वाढल्या आहेत. नवी दिल्लीः केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केल्या आहेत. सरकारच्या या मार्गदर्शक सूचना करोनाचे माइल्ड, प्रीसिम्टेमेटिक आणि एसिम्टेमेटीक रुग्णांशी संबंधित आहेत. एचआयव्ही आणि कॅन्सरच्या रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये ठेवता येणार नाही. आता त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार करावा लागले. तर होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांना लक्षणाच्या सुरुवातीपासून १० दिवसांनी डिस्चार्ज दिला जाईल.