मुंबईतील शॉपिंग सेंटरमध्ये आगडोंब; अग्निशमन जवानांच्या मदतीला रोबो - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, July 11, 2020

मुंबईतील शॉपिंग सेंटरमध्ये आगडोंब; अग्निशमन जवानांच्या मदतीला रोबो

https://ift.tt/2ZXzYCC
मुंबई: पश्चिमेकडील स्वामी विवेकानंद मार्गावर असलेल्या इंद्रप्रस्थ शॉपिंग सेंटरला अचानक मोठी आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तब्बल १४ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने आगीत कसलीही जीवितहानी झाली नाही. () पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. ड्युटीवर असलेल्या सुरक्षा रक्षकानं याबाबत आपल्या वरिष्ठांना माहिती दिली. त्यानंतर लगेचच अग्निशमन दलाला कळवण्यात आलं. शॉपिंग सेंटरमधील एका दुकानात शॉर्ट सर्किट झाल्यामुळं ही आग लागल्याची माहिती सुरक्षा रक्षकांनी दिली आहे. सुरुवातीला ही आग तळमजल्यापर्यंत मर्यादित होती. मात्र, काही वेळातच आगीच्या ज्वाळा आणि धुरानं पहिला मजलाही व्यापला. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन अग्निशमन दलाचे १४ बंब आणि १३ टँकर घटनास्थळी पोहोचले असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. धूर बाहेर पडण्यासाठी जागा मिळावी म्हणून जेसीबीच्या साहाय्यानं तळमजल्यावरील ग्रील काढले जात आहेत. धुरामुळे अग्निशमन जवानांना काम करताना अडचणी येत आहेत. तब्बल सात तासांनंतरही आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं नाही. त्यामुळं रोबोची मदत घेतली जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. आगीच्या घटनेनंतर या परिसरातील वाहतूक बंद करण्यात आली आहे. बोरीवली स्थानकाला लागूनच दोन मजल्याचे हे इंद्रप्रस्थ शॉपिंग सेंटर आहे. या इमारतीत एकूण ७७ व्यावसायिक गाळे आहेत. आगीचं स्वरूप मोठं असल्यानं यात मोठं आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुंबईत आगीच्या घटनांचे प्रमाण सातत्यानं वाढत आहे. काही दिवसांपूर्वीच नरीमन पॉइंट येथील बँक ऑफ बहरीन अँड कुवेतच्या कार्यालयाल आग लागली होती. त्यात बँकेतील महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली होती. त्याआधी प्रसिद्ध क्रॉफर्ड मार्केटमध्ये काही दुकानांना आग लागली होती. आणखी वाचा: