नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता हत्या प्रकरणाची सुरू झालीय. त्यानंतर विश्व हिंदू परिषदेनंही () महाराष्ट्रात चार महिन्यांपूर्वी झालेल्या दोन साधुंसहीत तीन जणांच्या हत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केलीय. 'जर अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची केंद्रीय संस्थेकडून चौकशी केली जात असेल तर पालघरमध्ये झालेल्या प्रकरणाची का होऊ शकत नाही?' असा प्रश्न विश्व हिंदू परिषदेनं विचारलाय. विहिंंपची मागणी महाराष्ट्राच्या पालघरमध्ये एक सुनियोजित कटासहीत दोन साधू आणि त्यांच्या वाहन चालकाची हत्या करण्यात आली होती. ज्या जागेवर या हत्या घडवून आणण्यात आल्या. तिथं ख्रिश्चन मिशनरीज सक्रीय आहेत. त्यांच्याच इशाऱ्यावर निर्दोष साधुंची हत्या करण्यात आली, असा दावा विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल यांनी केलाय. 'महाराष्ट्र पोलिसांनी या प्रकरणात काहींना अटक केली असली तर हत्येचा कट रचणाऱ्या खऱ्याखुऱ्या खुन्यांचा पर्दाफाश होणं गरजेचं आहे आणि हे सीबीआय चौकशीमुळे शक्य होईल' असंही बन्सल यांनी म्हटलंय. ABAP चीही मागणी दुसरीकडे अखिल भारतीय आखाडा परिषदेच्या (ABAP) म्हणण्यानुसार, अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश देत सर्वोच्च न्यायालयानं मुंबई पोलिसांची असक्षमता अधोरेखित केलीय. सोबतच आखाडा परिषदेकडून १६ एप्रिल रोजी मुंबईनजिकच्या पालघरमध्ये झालेल्या दोन साधुंच्या हत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केलीय. परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी यांच्या म्हणण्यानुसार, पालघरमध्ये झालेल्या हत्या प्रकरणात सीबीआय चौकशीसाठी एक प्रस्ताव पारित केला जाईल आणि गरज लागलीच तर आखाडा परिषदेद्वारे कोर्टाचा दरवाजाही ठोठावला जाईल. वाचा : वाचा : काय आहे साधु हत्या प्रकरण? १६-१७ एप्रिलच्या रात्री महाराष्ट्रातील स्थित आदिवासीगडचिंचले गावात दोन साधुंवर जमावानं अचानक हल्ला केला होता. हे दोघं साधु एका गाडीतून या गावातून प्रवास करत होते. घटनास्थळावर पोलीस उपस्थित असूनही ते जमावाला अटकाव करू शकले नाहीत आणि ग्रामस्थांनी पोलिसांसमोर दोन साधू आणि कार चालकाची मारहाण करत हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेअगोदर सोशल मीडिया अॅपद्वारे या भागात चोर फिरत असल्याचे काही मॅसेज व्हायरल करण्यात आले होता. घटनेनंतर पोलिसांकडून जवळपास १०० जणांना अटक करण्यात आली होती. विहिंपनं मात्र महाराष्ट्र पोलिसांकडून खऱ्या दोषींना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचं म्हटलंय. वाचा : वाचा :