नवी दिल्ली: भारतीय रेल्वेने २०१९-२० साली एक कोटीहून अधिक लोकांना विना तिकीट प्रवास करताना ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून तब्बल ५६१.७३ कोटी रुपये इतका वसूल केला आहे. २०१८-१९च्या तुलनेत यात ६ टक्के इतकी वाढ झाली आहे. माहितीच्या अधिकाराखाली विचारण्यात आलेल्या अर्जातून ही माहिती मिळाली. रेल्वेने २०१६ ते २०२० या काळात विना तिकीट प्रवास करणाऱ्यांकडून १ हजार ९३८ कोटी रुपयांची कमाई केली. वाचा- मध्य प्रदेशमधील आयटीआय कार्यकर्ते चंद्र शेखर गौडा यांनी दाखल केलेल्या RTI द्वारे ही माहिती मिळाली. रेल्वेने २०१६-१७ साली विना तिकीट प्रवास करणाऱ्यांकडून ४०५.३० कोटी रुपये दंड वसूल केला होता. २०१७-१८ साली ४४१.६२ कोटी रुपये तर २०१८-१९ मध्ये ५३०.०६ कोटी रुपये दंड वसूल केला. त्या शिवाय २०१९-२० साली १.१० कोटी प्रवाशांना विना तिकीट प्रवास करताना पकडण्यात आले. वाचा- विना तिकीट प्रवास करणाऱ्यांकडून तिकीट मुल्यासह कमीत कमी २५० रुपये इतका दंड वसूल केला जातो. जर अशा प्रवाशांनी दंड वसूल करण्यास नकार दिला तर त्यांना रेल्वे पोलिस दलाच्या ताब्यात दिले जाते. तसेच त्यांच्यावर रेल्वे कायदा कलम १३७ नुसार कारवाई केली जाते. त्यानंतर त्यांना न्यायालयात नेले जाते. न्यायालय संबंधित व्यक्तीवर १ हजार रुपये दंड करू शकतात. व्यक्तीने जर दंड नाही भरला तर त्याला सहा महिन्यांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. वाचा- २०१८ साली एका संसदीय रेल्वे समितीने २०१६-१७ साली विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांमुळे मोठे नुकसान झाल्याचे म्हटले होते. वाचा- या बरोबर रेल्वेने करोना व्हायरसमुळे रद्द करण्यात आलेल्या तिकीटांचा माहिती दिली. यानुसार मार्चपासून १.७८ कोटी इतकी तिकीटे रद्द करण्यात आली. या तिकीटांसाठी २ हजार ७२७ कोटी रक्कम परत करण्यात आली. देशात २५ मार्चपासून रेल्वे सेवा स्थगित करण्यात आली. अद्यापही देशात रेल्वे सेवा नियमितपणे सुरू झालेली नाही.