अमेरिकेत दोन महिन्यात करोना लसचा वापर? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, August 25, 2020

अमेरिकेत दोन महिन्यात करोना लसचा वापर?

https://ift.tt/3j9FD0i
वॉशिंग्टन: अमेरिकेत करोनाचा संसर्ग वाढत असून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका सुरू आहे. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांना त्याचा मोठा फटका बसणार असल्याची चर्चा सुरू आहे. अशातच आता अमेरिकेत दोन महिन्यात लशीचा वापर सुरू होणार असल्याचे बोलले जात आहे. अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये अध्यक्षपदाची निवडणूक होत असून, त्यापूर्वी ब्रिटनमध्ये ऑक्सफोर्ड अॅस्ट्राझेनेका विकसित करीत असलेली कोव्हिड-१९ प्रतिबंधात्मक लस अमेरिकेत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चालविला आहे. त्यामुळे आता ट्रम्प यांनी 'डॅमेज कंट्रोल' करण्याचे प्रयत्न सुरू केले असल्याची चर्चा सुरू आहे. करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी लस विकसित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. काही लशींची चाचणी तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात आली आहे. अमेरिकेतील काही लशींची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. सध्या सुरू असलेल्या लस चाचणीत ऑक्सफोर्ड अॅस्ट्राझेनेकाच्या लशीवर अधिक लक्ष लागले आहे. अमेरिकेत करोनाविरुद्धच्या लढाईचा एक भाग म्हणून ऑक्टोबरमध्येच ही लस आणीबाणीच्या काळासाठी म्हणून औषध प्रशासनाने वापरण्यास मान्यता देण्याचा पर्यायही तपासला जात असल्याचे वृत्त फायनान्शियल टाइम्सने दिले आहे. मात्र, अॅस्ट्राझेनेकाने ही शक्यता फेटाळली आहे. अशा प्रकारची कोणतीही चर्चा अमेरिकी सरकारबरोबर सुरू नाही आणि त्याच्या शक्यतेबद्दल आत्ताच बोलता येणार नाही, असे अॅस्ट्राझेनेकाच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले आहे. या लशीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या ब्रिटन आणि अन्य देशांमध्ये सुरू आहेत. त्यामुळे त्याच्या निष्कर्षाबद्दल आत्ताच बोलणे योग्य नाही, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे. वाचा: वाचा: दक्षिण कोरियात वाढता फैलाव दक्षिण कोरियात सलग ११ व्या दिवशी तीन आकडी रुग्णसंख्या असून, सोमवारीही देशात २६६ नवे रुग्ण आढळले. आढळलेले नवे रुग्ण हे बुसान, दायेजिओंग आणि सेजोंग या भागात आढळले आहेत. येत्या काही दिवसांत रुग्णसंख्येचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढण्याची भीती कोरियाच्या साथरोग प्रतिबंधात्मक केंद्राचे संचालक जिओंग यून केयाँग यांनी म्हटले आहे. वाढती रुग्णसंख्या पाहून सरकारने रविवारीच मोठे उपस्थितीतील कार्यक्रम, नाइट क्लब आणि चर्चेसमधील गर्दीवर बंदी घातली आहे. खेळांसाठी उपस्थित असलेल्या चाहत्यांनाही दूर करण्यात आले आहे. वाचा: चीनमध्ये रुग्ण नाही चीनमध्ये गेल्या आठ दिवसांत एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. सोमवारी १६ रुग्ण आढळले असले तरी ते परदेशातून आलेले आहेत. यामुळे बीजिंग आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलसारखे सार्वजनिक कार्यक्रम पुन्हा सुरू होत आहेत. बीजिंग आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल एप्रिल महिन्यांत होणार होता, मात्र करोनामुळे तो लांबणीवर टाकण्यात आला होता. आता तो प्रथमच रेड कार्पेटशिवाय होत आहे. देशातील चित्रपटगृहे पुन्हा सुरू झाली असून, शांघाय फिल्म फेस्टिव्हलला १५ हजार प्रेक्षकांनी गर्दी केली होती.