पुणे टाइम्स टीम अभिनेत्री हिच्या '' या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणाला येत्या नोव्हेंबरमध्ये सुरुवात होणार आहे. , आणि यांनी लिहिलेली ही कथा एका महिला धावपटूवर आधारित आहे. ही एका गावातल्या तरुणीची कथा असून, ती वेगानं धावू शकते. त्यामुळे गावकरी तिला 'रॉकेट' म्हणून ओळखतात. तापसी म्हणाली, 'मी या प्रोजेक्टमध्ये अगदी सुरुवातीपासून सहभागी आहे. या व्यक्तिरेखेत शिरण्यासाठी करोनाच्याच्या आधी मी तीन महिने प्रशिक्षण घेत होते. आता मोठा ब्रेक झाला आहे. मात्र, या विषयामुळे पुन्हा एकदा लवकर काम सुरू करण्यास उत्सुक आहे. आता किमान एक महिनाभर ट्रेनिंग करावं लागेल आणि त्यानंतर चित्रीकरणाला सुरुवात होईल.' आकर्ष खुराना या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे.