देशाच्या विकासासाठी महाराष्ट्राने करोना लढाई जिंकावी: मोदी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, August 13, 2020

देशाच्या विकासासाठी महाराष्ट्राने करोना लढाई जिंकावी: मोदी

https://ift.tt/2DNxuj5
नवी दिल्ली: दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान यांनी करोनाशी लढणाऱ्या १० राज्यांसोबत बैठक घेतली आणि त्यांना यातून बाहेर पडण्यासाठी मार्गदर्शन आणि प्रेरणा दिली. मोदींनी ही बैठक घेण्याचे कारण फक्त करोनावर विजय मिळवण्याचे नव्हेत तर त्याचे अन्य एक कारण होते. ते कारण म्हणजे अर्थव्यवस्थेचा गाडा पुन्हा सुरू झाला पाहिजे. वाचा- मोदींनी ज्या १० राज्यांशी चर्चा केली त्याचे देशाच्या जीडीपीमधील योगदान ६७ टक्के इतके आहे. पण ही राज्य करोनाच्या विळख्यात सापडली आहेत. मंगळवारी मोदींनी महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पंजाब, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, कर्नाटक आणि गुजरात या राज्यातील मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. मोदींनी सांगितले की ही राज्य करोना विरुद्धची लढाई जिंकले तर देश देखील जिंकले. वाचा- देशातील या १० राज्यात अनलॉक ३.०ची प्रक्रिया सुरू झाली आहे. आर्थिक व्यवहार ७० टक्क्यांपर्यंत गेला आहे. सेवा क्षेत्र आणि उत्पादन क्षेत्राची गती करोना आधीच्या ९० टक्क्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आर्थिक घडामोडींचा वेग वाढवण्याची गरज आहे. या राज्यातील काही जिल्ह्यात औद्योगिक उत्पादनाचे काम ६० ते ७० टक्के इतके सुरू आहे. पण सेवा क्षेत्रातील घडामोडी ठप्पच आहेत. यात हॉटेल, पर्यटन, आर्थिक सेवा, सिनेमा आणि वाहतूक आदीचा समावेश होतो. वाचा- देशाच्या आर्थिक विकास दरात सेवा क्षेत्राचे योगदान ६१.५ टक्के इतके आहे. यामुळे २५ टक्के रोजगार मिळतो. तर उत्पादन क्षेत्राचा वाटा २३ टक्के असून त्यातून २२ टक्के रोजगार मिळतो. करोना काळात कृषी क्षेत्राशी संबंधित व्यवहार सुरू होते. पण आर्थिक विकासासाठी हे पुरेसे नाही. जीडीपीमध्ये कृषी क्षेत्राचे योगदान फक्त १५.४ टक्के इतके आहे. करोनामुळे सेवा क्षेत्राशी संबंधीत २५ टक्के रोजगार पूर्णपणे ठप्प आहे. वाचा- तसेच या १० राज्यातील विकास दराचा फरक दुसऱ्या राज्यावर होत आहे. महाराष्ट्र आणि गुजरातमधून देशातील सर्व भागात चक्का माल पुरवला जाते. जो सध्या करोनामुळे विस्कळीत झाला आहे. देशाच्या GDPमध्ये राज्याचे असलेले योगदान महाराष्ट्र-१४.११ तामिळनाडू-८.५५ उत्तर प्रदेश-८.०५ कर्नाटक-७.९० गुजरात-७.६९ पश्चिम बंगाल-५.८५ तेलंगणा-४.४१ आंध्र प्रदेश-४.७४ बिहार- २.८४ पंजाब- २.८०