मुंबई: राजस्थानमधील '' फसल्याने त्यावरून शिवसेनेने भाजपवर निशाणा साधला आहे. राजस्थानात ‘ऑपरेशन कमळ’ फसले. हा राजकीय विकृतीचा पराभव आहे, अशी टीका शिवसेनेने भाजपवर केली आहे. ‘शोले’ चित्रपटातील ‘गब्बर सिंग’प्रमाणे ‘ऑपरेशन कमळ’ची दहशत निर्माण केलीच होती. ‘‘सो जा बच्चे, नही तो गब्बर आ जायेगा’’ या धर्तीवर विरोधी सरकारांनी सरळ गुडघे टेकावेत, नाहीतर ‘ऑपरेशन कमल हो जायेगा’ या भीतीचे सावट निर्माण करण्यात आले होते. मात्र राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ‘ऑपरेशन कमळ’चेच ऑपरेशन करून भाजपला धडा दिला. काही ऑपरेशन टेबलावरच फसतात. महाराष्ट्रातही पहाटेचे ऑपरेशन फसले. आता सप्टेंबर महिन्यातील ऑपरेशनची नवी तारीख भोंदू डॉक्टरांनी दिली आहे. राजस्थानमधले ऑपरेशन महिनाभर चालले व फसले. भाजपने आता तरी धडा घ्यावा. थोडे थांबायला काय हरकत आहे. थांबा आणि पुढे जा, वळणावर धोका आहेच, असा टोला शिवसेनेने भाजपला लगावला आहे. दैनिक 'सामना'तील अग्रलेखातून ही टीका करण्यात आली आहे. शिवसेनेची ऑपरेशन कमळवर टीका >> बंडखोर नेते यांनी दिल्लीत येऊन प्रियंका-राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर पायलट यांनी माघार घेतली. या महिनाभराच्या घोडेबाजारात हसे झाले आहे ते भारतीय जनता पक्षाचे. आपल्या विचारांची नसलेली राज्या-राज्यांतील सरकारे आम्ही चालू देणार नाही किंवा सरळ पाडू हे त्यांचे धोरण आहे, पण राजकीय घमेंडीत त्यांचा सौदा चुकतो व शेअर बाजार गडगडतो. सचिन पायलट यांचे बंड यशस्वी झाले नाही. कारण पहिल्या झटक्यात ते आमदारांचा मोठा आकडा जमवू शकले नाहीत व अशोक गेहलोत यांची खिंड भेदू शकला नाही. >> सरकार पाडण्यासाठी जे हातखंडे एरवी भाजप वापरतो, तेच ‘उपाय’ वापरून गेहलोत यांनी भाजपचा घोडेबाजार उधळला व सचिन पायलट यांचे बंड यशस्वी होऊ दिले नाही. आता राहिलेले काम दिल्लीत प्रियंका व राहुल गांधी यांनी केले आहे. >> पैसा व तपास यंत्रणा हाती असल्यावर प्रत्येक वेळी सरकारे पाडता येतातच असे नाही. मुळात विरोधी पक्षांची सरकारे चालूच द्यायची नाहीत हा अट्टहास लोकशाहीत का बाळगावा? महाराष्ट्रातले सरकार सप्टेंबरपर्यंत पाडूच पाडू असे आता भाजपातील उपऱया नेत्यांनी छातीठोकपणे सांगितले. राजस्थानात काम फसफसले तेव्हा आता महाराष्ट्रात पाडापाडीचे काम सुरू करायचे हे कसले धोरण? >> महाराष्ट्र सरकार अस्थिर करण्याचे व पाडण्याचे प्रयत्न सुरू असतील तर ते त्यांनी खुशाल करावेत, पण त्यासाठी उगाच तोंडाच्या वाफा का दवडता? भाजपवाल्यांना तर झारखंडचे सरकारही पाडायचे आहे, पण त्यांना ते अजून तरी जमलेले नाही. राष्ट्रापुढील सर्व प्रश्न जणू संपले आहेत. त्यामुळे विरोधी पक्षांची सरकारे पाडण्यात मन रमवण्याचे उद्योग सुरू आहेत. >> महाराष्ट्र असो की , पश्चिम बंगाल असो की झारखंड, तेथे फालतू बखेडे निर्माण करायचे व अस्थिरता निर्माण करायची हे राजकीय मनोरुग्णतेचे लक्षण नव्हे काय? >> बिहारमध्ये ‘विकास’ हा मुद्दा साफ खड्ड्यात गेल्याने मुंबईतील सुशांतसिंह राजपूत प्रकरणावर राजकीय गुजराण सुरू झाली आहे. खरे तर यांच्यापेक्षा विरोधकांची सरकारे उत्तम चालली आहेत, पण त्यांना केंद्राची अजिबात मदत नाही की सहकार्याची भावना नाही. म्हणूनच राजस्थानात ‘ऑपरेशन कमळ’ फसले.