पार्कमध्ये फिरायला गेलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, August 24, 2020

पार्कमध्ये फिरायला गेलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार

https://ift.tt/32iLHwF
जहानाबाद: बिहारच्या जहानाबादमध्ये एका विवाहित महिलेवर झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इंडोर स्ट्रेडियम पार्कमधील एका गोदामात नेऊन या महिलेवर चौघांनी बलात्कार केला. पीडितेच्या जबाबानंतर एफआयआर दाखल केला असून, पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. घटनास्थळावर दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळल्या आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली. पोलीस अधीक्षक मीनू कुमारी यांनी सांगितले की, सदर रुग्णालयात पीडित महिलेची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. तसेच फिंगरप्रिंट तज्ज्ञांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन तेथून काही नमुने गोळा केले आहेत. या प्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली आहे. मोहम्मद सुल्तान, मोहम्मद आमिर, मोहम्मद सोनू अशी त्यांची नावे आहेत. जहानाबादच्या गडेरिया खंड आणि शेखआलमचक मोहल्ल्यातील रहिवासी आहेत. आणखी एका अनोळखी आरोपीला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलने सांगितले की, २० ऑगस्ट रोजी दुपारी ती पार्कात फिरण्यासाठी गेली होती. त्याचवेळी पार्क परिसरातील एका गोदामात नेऊन चार तरुणांनी बलात्कार केला. पीडित महिलेच्या पतीने सांगितले की, आरोपींमधील दोघांसोबत आधीपासूनच जमिनीवरून वाद सुरू आहे. पत्नी आणि मुलीवर अत्याचार करण्याची धमकी आरोपींनी यापूर्वी दिली होती. महिलेने या प्रकरणी पोलिसांवरही आरोप केले आहेत. अत्याचाराच्या घटनेनंतर त्याबाबत तक्रार देण्यासाठी महिला पोलीस ठाण्यात गेले असता, तेथील कर्मचाऱ्यांनी दखल घेतली नाही. त्यामुळे अखेर न्यायालयात धाव घ्यावी लागली. पीडितेने आरोप केल्यानंतर पोलीस ठाण्याच्या प्रमुख अलका सोनी यांच्याकडे पोलीस अधीक्षकांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. निलंबित करून विभागीय चौकशी का करू नये, असे त्यात म्हटले आहे.