'न्यूझीलंडमध्ये देवी जागृत आहे, मला तिथं जाऊन राहायचंय' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, August 11, 2020

'न्यूझीलंडमध्ये देवी जागृत आहे, मला तिथं जाऊन राहायचंय'

https://ift.tt/30LIC8J
मुंबई: भारतात दिवसागणिक भयावह होत चाललेल्या करोनाच्या परिस्थितीवरून प्रसिद्ध दिग्दर्शक यानं केंद्र सरकारवर तिरकस टीका केली आहे. 'मागच्या १०० दिवसांत तिथं एकही करोनाबाधित रुग्ण सापडलेला नाही. मला न्यूझीलंडला जाऊन राहायचं आहे,' असं त्यानं म्हटलं आहे. भारतात करोनाचा संसर्ग वाढतच असून एकूण बाधितांचा आकडा आजघडीला साडे बावीस लाखांच्याही पुढं गेला आहे. तर, ४५ हजारांहून अधिक मृत्यू झाले आहेत. जगातील इतर देशांनी मात्र करोनावर बऱ्याच प्रमाणात नियंत्रण मिळवलं आहे. जेसिंडा अॅर्डन या महिला पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली करोनाशी लढणाऱ्या न्यूझीलंडनं उल्लेखनीय करोनाला हद्दपार करण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे. १ मे रोजी न्यूझीलंडमध्ये लॉकडाऊन शिथील करण्यात आला होता. तेव्हापासून मागच्या १०० दिवसांत एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. वाचा: याच अनुषंगानं केदार शिंदे यानं ट्वीट करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. 'मला न्यूझीलंडमध्ये जाऊन राहायचयं. त्यांना कसं शक्य झालं माहीत नाही पण, गेल्या १०० दिवसांत तिथे एकही करोना बाधित रुग्ण सापडलेला नाही. न्यूझीलंडमध्ये महिला पंतप्रधान आहे. तिथे देवी जागृत आहे. आम्ही इथे फक्त 'बेटी पढाव, बेटी जगाव'चे फतवेच काढत राहणार,' अशी बोचरी टीकाही केदारने केली आहे. केदारच्या या ट्वीटनंतर त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. त्याला ट्रोल केलं जात आहे. मात्र, या टीकाकारांनाही त्यानं सणसणीत उत्तर दिलंय. 'काही लोकांच्या मेंदूचा केमिकल लोच्या झालाय. उपरोध, तिरकसपणा या विषयी त्यांना काहीच कळत नाही. एखादी पोस्ट टाकली की उत्तरादाखल हे बुद्धीचं प्रदर्शन मांडणार. एक मोबाइल, आईबापाने भरलेला मोफत डेटा, भक्तीची पट्टी डोळ्यांवर बांधून यांची बोटं मोबाइलवर फिरतात! कृष्णानं जन्मून आता मर्दन करावं,' अशी इच्छाही त्यानं व्यक्त केली आहे.