नोकरदारांसाठी आनंदाची बातमी; एका वर्षातच मिळणार ग्रॅच्युटी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, August 11, 2020

नोकरदारांसाठी आनंदाची बातमी; एका वर्षातच मिळणार ग्रॅच्युटी

https://ift.tt/3gGW6Z3
नवी दिल्ली: केंद्रातील नरेंद्र लवकरच ग्रॅच्युटीच्या नियमात बदल करणार आहे. या नव्या नियमानुसार ग्रॅच्युटीची रक्कम ५ वर्षाच्या ऐवजी १ ते ३ वर्षात मिळू शकेल. याचाच अर्थ पाच वर्ष काम करणाऱ्याला देखील मिळेल. केंद्र सरकारकडून लवकरच नोकरदार वर्गासाठी आनंदाची घोषणा होऊ शकते. वाचा- केंद्र सरकार ग्रॅच्युटीच्या नियमात बदल करण्याचा विचार करत असून यानुसार ग्रॅच्युटीसाठी सध्या असलेला ५ वर्षाचा कालावधीची अट काढून घेतली जाईल आणि ती एक ते तीन वर्ष इतका ठेवला जाऊ शकतो. जर असेल झाले तर सध्याच्या तुलनेत अधिक लोक ग्रॅच्युटीचे पैसे काढू शकतील. सध्याच्या नियमानुसार एखाद्या कर्मचाऱ्याने एका कंपनीच पाच वर्षापर्यंत काम करणे आवश्यक असते. तरच त्याला ग्रॅच्युटी मिळते. अनेक जण पाच वर्षाच्या आत नोकरी बदलतात. यामुळे संबंधित कर्मचाऱ्याच्या ग्रॅच्युटीचा फायदा कंपनीला होतो. वाचा- आता दोन गोष्टींवर सरकारचा विचार सुरू आहे. काही सेक्टरसाठी बदल करावा किंवा सर्वांसाठी ग्रॅच्युटीचा कालावधी कमी करावा. एकूण दुसऱ्या पर्यायाला अधिक लोकांचे समर्थन आहे. बदल का केले जात आहेत? ग्रॅच्युटीच्या नियमात बदल करण्याची दोन महत्त्वाची कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे नोकरीतील सुरक्षितता होय, जी पहिल्याच्या तुलनेत फार कमी झाली आहे. करोना व्हायरसच्या काळात यात फार असुरक्षितता आली. दुसरे कारण म्हणजे करारावर काम करणाऱ्यांची वाढती संख्या होय. यामुळे कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटीचा फायदा फार कमी मिळतो याचा लाभ थेट कंपन्यांना मिळतो. वाचा- अनेकदा कंपन्या कॉस्ट कटिंगच्या नावाखाली कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युटी घेतात. अशा कंपन्या कर्मचाऱ्यांना पाच वर्ष कालावधी होण्याआधीच कामावरून काढून टाकता. यामुळे जो फायदा कर्मचाऱ्यांना मिळायला हवा तो कंपन्या स्वत:च्या फायद्यासाठी चुकीच्या पद्धतीने वापरतात. सरकारचा प्रयत्न आहे का ग्रॅच्युटीला देखील पीएफ सारखे करावे. म्हणजे जेव्हा एखादा कर्मचारी दुसऱ्या कंपनीत नोकरी करण्यास जातो तेव्हा तो त्याची ग्रॅच्युटी देखील पीएफ प्रमाणे टॅन्सफर करेल. आता हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे की सरकार यात किती बदल करते. जेणेकरून कर्मचाऱ्यांना फायदा होईल. वाचा- ज्या प्रमाणे पीएफ मध्ये प्रत्येक महिन्यात एक विशिष्ट रक्केचे योगदान दिले जाते. त्याच प्रमाणे ग्रॅच्युटीचे निमय करण्याचा विचार आहे. ग्रॅच्युटीला सीटीसी म्हणजेच कॉस्ट टू कंपनी भाग करण्याचा प्रस्ताव आहे. ग्रॅच्युटी म्हणजे काय? एका कंपनीत अनेक वर्ष काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला पगार, पेन्शन आणि पीएफ शिवाय ग्रॅच्युटी देखील दिले जाते. ग्रॅच्युटीचा छोटा भाग कर्मचाऱ्याच्या पगारातून कापला जातो आणि एक मोठा हिस्सा कंपनीकडून दिला जातो. सध्याच्या नियमानुसार पाच वर्ष एकाच ठिकाणी काम केल्यास संबंधित कर्मचाऱ्याला ग्रॅच्युटीचा लाभ मिळतो. नियमानुसार ज्या कंपनीत १० किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी असतात त्या आपल्या कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटी देतात.