दिलासा : नव्या करोनाबाधित रुग्णांपेक्षा बरं होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, September 21, 2020

दिलासा : नव्या करोनाबाधित रुग्णांपेक्षा बरं होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक

https://ift.tt/2RLizcw
नवी दिल्ली : आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, भारतात गेल्या २४ तासांत (रविवारी सकाळी ८.०० ते सोमवारी सकाळी ८.०० वाजेपर्यंत) ८६ हजार ९६१ आढळले आहेत. यामुळे, देशातील एकूण रुग्णांची संख्या ५४ लाख ८७ हजार ५८० वर पोहचलीय. गेल्या २४ तासांत १ हजार १३० रुग्णांच्या करण्यात आलीय. यासोबतच देशातील आत्तापर्यंतच्या करोना व्हायरसमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ८७ हजार ८८२ वर पोहचलीय. एका दिवसात ९३ हजार ३५६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय. त्यामुळे आत्तापर्यंत करोनावर मात केलेल्या रुग्णांची एकूण संख्या ४३ लाख ९६ हजार ३९९ वर आहे. वाचा : वाचा : उल्लेखनीय म्हणजे, नव्यानं दाखल होणाऱ्या रुग्णांपेक्षा संक्रमणमुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे ही दिलासादाखक गोष्ट आहे. देशाचा रिकव्हरी रेट (रुग्ण बरे होण्याचं प्रमाण) ८०.११ टक्क्यांवर पोहचलंय. सध्या एकूण १८.२८ टक्के रुग्णांवर अर्थात १० लाख ०३ हजार २९९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात मृत्यूदर १.६ टक्के नोंदवण्यात आलाय तर पॉझिटिव्हिटी रेट ११.८८ टक्के नोंदवण्यात आलाय. म्हणजेच, जेवढ्या सॅम्पल्सची चाचणी केली जातेय त्यापैंकी ११.८८ टक्के रुग्ण पॉझिटिव्ह आढळत आहेत. गेल्या २४ तासांत ७ लाख ३१ हजार ५३४ सॅम्पल्सच्या चाचण्या पार पडल्यात. देशात एव्हाना ६ कोटी ४३ लाख ९२ हजार ५९४ सॅम्पल्सच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. उल्लेखनीय म्हणजे, केवळ सप्टेंबर महिन्यात १८ लाख ६६ हजार ३३५ संक्रमित रुग्ण आढळले होते. तर याच महिन्यात १५ लाख ३९ हजार २७२ रुग्ण बरे झाले. २३ हजार ४१३ रुग्णांचा मृत्यू झाला. २ सप्टेंबरपासून सलग दररोज १००० रुग्णांच्या मृत्यूची नोंद होतेय. वाचा : वाचा :