अटल टनेल तयार... चीन खबरदार!, मोदींनी केले जगातील सर्वात मोठ्या बोगद्याचे उद्घाटन - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, October 3, 2020

अटल टनेल तयार... चीन खबरदार!, मोदींनी केले जगातील सर्वात मोठ्या बोगद्याचे उद्घाटन

https://ift.tt/34knCGP
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात मोठा बोगदा 'अटल बोगद्याचे' आज शनिवारी हिमाचल प्रदेशातील रोहतंग येथे उद्घाटन केले. या बोगद्यामुळे हिमाचल प्रदेशातील जनतेला तर मोठा फायदा होईलच, परंतु भारतीय लष्कराला रसद पुरवणे हे काम देखील सोपे होणार आहे. तसेच चीनकडील सीमेवर कोणत्याही ऋतुमध्ये पोहोचणे देखील आता सोपे होणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. लेह, लडाखची लाइफलाइन बनेल असे पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात म्हणाले. लेह-लडाखमधील शेतकरी, मजूर आणि युवकांना आता राजधानी दिल्लीपर्यंत पोहोचणे सोपे होणार आहे. या टनेलमुळे आता मनाली आणि केलांगमधील अंतर ३ ते ४ तासांनी कमी होणार आहे, असे सांगतानाच दुर्गम भागात ३ ते ४ तासांचे अंतर कमी होण्याचा अर्थ काय असतो हे हिमाचल प्रदेशातील माझ्या बंधुभगिनींना चांगलाच माहीत आहे, असे मोदी म्हणाले. अटल टनेल भारताच्या सीमेवरील पायाभूत सुविधांना नवी शक्ती प्रदान करणारा ठरणार आहे. अटल टनेल हा जागतिक पातळीवरील सीमासंपर्काचे एक जीवंत उदाहरण आहे, असे मोदी म्हणाले. गेल्या सहा वर्षांच्या काळात आमच्या सरकारने जुनी परिस्थिती बदलण्याच्या दिशेने अभूतपूर्ण प्रयत्न केले आहेत. हिमालय क्षेत्र, जम्मू आणि काश्मीर, कारगील, लेह-लडाख, उत्तराखंड, सिक्किममध्ये अनेक प्रकल्प पूर्ण करण्यात आले आहेत. या बरोबरच अनेक प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गाला असल्याचे मोदी म्हणाले हा बोगदा जगातील सर्वात मोठा बोगदा आहे. या बोगद्याची लांबी ९.०२ किलोमीटर इतकी आहे. या उद्घाटन समारोहात पंतप्रधान मोदी यांच्यासह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे देखील उपस्थित होते. या बोगद्यामुळे आता मनाली आणि लेहदरम्यानचे अंतर ४६ किलोमीटरने अंतर कमी झाले आहे. तसेच संपूर्ण प्रवासाचा वेळ चार ते पाच तासांनी कमी होणार आहे. ९.०२ किलोमीटर लांबीचा या बोगद्यामुळे आता वर्षभर लाहोल स्पिती खोऱ्याशी संपर्क सुरू राहणार आहे. या पूर्वी हिमवर्षावामुळे या खोऱ्याचा संपर्क सहा महिन्यांसाठी तुटलेला असायचा. क्लिक करा आणि वाचा- हिमाचलच्या जनतेची दशकांची प्रतीक्षा संपली उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदी यांनी हिमाचलमध्ये घालवलेल्या दिवसांची स्मृती जागवली. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यासोबत मोदी नेहमीच येथे येत असत. आज केवळ अटलबिहारी वाजपेयी यांचेच स्वप्न पूर्ण झाले नसून, आज हिमाचल प्रदेशातील कोट्यवधी लोकांची दशकांपासूनची प्रतीक्षा संपलेली आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-