मुंबई- फक्त (एनसीबी) ड्रग्ज आणि बॉलिवूड लिंक्सची चौकशी करत नाही तर वेगवेगळ्या युनिट्सही ड्रग माफियांची चौकशी करत आहेत. त्याचबरोबर गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलने ५० लाख रुपयांचे या नावाची औषधं जप्त केली आहेत. या प्रकरणात आमिर आणि इनायत अली नावाच्या दोन आरोपींनाही अटक करण्यात आली आहे. किल्ला कोर्टाने या दोघांनाही ५ ऑक्टोबरपर्यंत गुन्हे शाखेच्या ताब्यात ठेवण्याचे आदेश दिले आहेत. एका गोळीची किंमत ४ ते ५ हजार, अर्ध्या तासात त्याचे परिणाम होतात या दोन्ही आरोपींनी वरिष्ठ निरीक्षक केदार पवार, लक्ष्मीकांत साळुंखे आणि अमित भोसले यांच्या टीमला सांगितलं की, बॉलिवूड, टीव्ही इंडस्ट्री आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील अनेक लोक त्यांच्याकडे ईसीएसटीएसआयची मोठी मागणी करतात. ही गोळी घेतल्याच्या अर्धा तासानंतर त्याचा प्रभाव जाणवायला सुरुवात होते. ही गोळी घेतल्यानंतर चार ते पाच तासांची झोप लागते. पण एनडीपीएस अॅक्ट अंतर्गत ECSTASY या गोळीवर बंदी घालण्यात आली आहे. विशेष म्हणजे अमली पदार्थांच्या व्यापारात गुंतलेले लोक एका गोळी मागे ४ ते ५ हजार रुपये घेतात. एका आरोपीचा कुरिअरचा व्यवसाय अटक केलेल्या आरोपींपैकी एक म्हणजे इनायत अलीचा कुरियर व्यवसाय आहे. लोक त्याला कुरिअरच्या माध्यमातूनच या गोळ्या पाठवायचे. लॉकडाउनमुळे त्याच्याकडे कित्येक महिन्यांपासून ECSTASY या गोळ्या पडून होत्या. जेव्हा हळू हळू मुंबईत अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली, तेव्हा इनायत अलीने त्याचा साथीदार आमिर याच्यामार्फत मागणीकर्त्यांकडे गोळ्या पाठवण्याचं काम सुरू केलं. जेव्हा डीसीपी नंदकुमार ठाकूर यांनी आपल्या टीमला यावर काम करण्यास सांगितलं तेव्हा त्यांना या संबंधीची माहिती मिळाली. यानंतर दोन आरोपींना अटक करण्यात आली. आतापर्यंतच्या तपासात गुन्हे शाखेला काही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दुवे सापडले आहेत. येत्या काही दिवसांत अनेक मोठी नावं समोर येतील अशी आशा तपास अधिकाऱ्यांना आहे.