अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना करोनाची बाधा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, October 2, 2020

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना करोनाची बाधा

https://ift.tt/2Gwh7bv
वॉशिंग्टन: अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना करोनाची बाधा झाली आहे. ट्विटरद्वारे ट्रम्प यांनी ही माहिती दिली आहे. त्याआधी डोनाल्ड ट्रम्प यांची खासगी सल्लागार होप हिक्स यांना करोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत: ला क्वारंटाइन केले होते. त्यांच्यासह त्यांच्या पत्नी मेलानियादेखील क्वारंटाइन झाल्या आहेत. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी ३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. ट्रम्प यांची खासगी सल्लागार होप हिक्सला करोनाची बाधा झाल्याचे समोर आल्यानंतर ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलेनिया यांनी गुरुवारी रात्री क्वारंटाइन होण्याचा निर्णय घेतला. होपला करोनाची लागण झाली असल्याचे समोर आल्यानंतर या दोघांनीही करोना चाचणी करून घेतली. त्याचा अहवाल समोर आल्यानंतर ट्रम्प यांनी ट्विट करून आपल्याला करोनाची लागण झाली असल्याचे म्हटले आहे. वाचा: वाचा: होप हिक्सला करोनाची बाधा झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट केले होते. होप हिक्स करोनाबाधित असल्याचे समोर आल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट केले. अतिशय मेहनतीने काम करणाऱ्या होप हिक्सला करोनाची लागण होणे हे धक्कादायक आहे. मेलेनिया आणि मी करोना चाचणी केली असून अहवालाची प्रतिक्षा असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. वाचा: होप हिक्स या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत नियमितपणे प्रवास करतात. होप हिक्स व अन्य काही अधिकारी क्लीवलँड, ओहियो येथे निवडणुकीच्या कामासाठी गेले होते.