दसरा मेळावा होणार का?; शिवसेनेनं दिले 'हे' संकेत - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, October 2, 2020

दसरा मेळावा होणार का?; शिवसेनेनं दिले 'हे' संकेत

https://ift.tt/34iv70N
मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक वादळे निर्माण करणाऱ्या शिवसेनेच्या ऐतिहासिक दसरा मेळाव्यावर यंदा करोनाचे सावट आहे. दसरा मेळाव्याचे भविष्य या क्षणी अधांतरीच आहे,' अशी स्पष्ट कबुली शिवसेनेचं मुखपत्र 'सामना'तूनच देण्यात आली आहे. महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान झाला आहे. त्यानंतरचा पहिला यंदा होणार का, याबाबत शिवसैनिकांमध्ये संभ्रम आहे. आजच्या 'सामना'च्या अग्रलेखातून करोनानंतरच्या परिस्थितीची दाहकता स्पष्ट करताना दसरा मेळाव्याबद्दलही काही संकेत देण्यात आले आहेत. 'देशासह महाराष्ट्रातही करोनाचे रुग्ण सातत्यानं वाढत आहेत. राज्य सरकारमधील अनेक मंत्री करोनाग्रस्त आहेत. मुख्य सचिव संजय कुमार यांनाही करोनाची लागण झाली आहे. हे चित्र आशादायक नाही. 'अनलॉक' होत असले तरी सगळे आलबेल नाही,' असं शिवसेनेनं म्हटलं आहे. वाचा: 'करोनामुळं लोकांना यंदा कुठलाही उत्सव साजरा करता आलेला नाही. ईद साजरी झाली नाही. गणपती कधी आले व गेले ते समजलेच नाही. इतका फिका गणेशोत्सव इतिहासात कधी साजरा झाला नव्हता. संकटच गंभीर असल्यानं आनंदास मुरड घालून सण-उत्सव साजरे करावे लागले आहेत. आता नवरात्री, दसरा, पाठोपाठ दिवाळी येत आहे. नवरात्रीच्या दांडियावर बंधने आलीच आहेत, पण शिवसेनेच्या ऐतिहासिक दसरा मेळाव्याचे भविष्यही या क्षणी अधांतरीच आहे,' असं अग्रलेखात नमूद करण्यात आलंय. वाचा: 'लाखो लोक विचारांचे सोने लुटायला शिवतीर्थावर जमतात. महाराष्ट्रातला हा एक राजकीय, पण सांस्कृतिक उत्सवच असतो. अनेक वादळांत हा दसरा मेळावा आजपर्यंत झालाच आहे. त्यामुळे महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान झाला असताना शिवसैनिकांच्या उत्साहास कसा बांध घालायचा हा प्रश्नच आहे. पण कायदा, नियमांचे पालन तर करावेच लागेल. छत्रपती शिवराय, आई जगदंबा जो मार्ग दाखवतील त्याच मार्गाने पुढे जावे लागेल. कायद्याच्या राज्याला गालबोट लागेल आणि त्यामुळे विरोधकांना टीकेचा दांडिया नाचवता येईल, असं काहीच घडणार नाही,' असं शिवसेनेनं म्हटलं आहे. वाचा: