पाटणा : विधानसभेच्या निकालानंतर नव्या सरकार गठनासाठी आज एनडीएची बैठक आयोजित करण्यात आलीय. या बैठकीपूर्वीच भाजपचे ज्येष्ठ नेते प्रेम कुमार यांनी पदासाठी आपला दावा दाखल केलाय. यांचा दावा प्रेमकुमार यांच्या उपमुख्यमंत्रीपदावरच्या या दाव्यानं भाजपमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. गेल्या ५० वर्षापासून आपण पक्षाची सेवा करत असल्याचं सांगत प्रेम कुमार यांनी हा दावा केलाय. सोबतच पक्ष जी जबाबदारी देईल ती स्वीकारण्यास तयार असल्याचंदेखील त्यांनी म्हटलंय. प्रेमकुमार हे सलग आठव्यांदा गया विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेत. मागच्या सरकारमध्ये प्रेमकुमार यांनी कृषी मंत्रालयाची जबाबदारी हाताळली होती. उल्लेखनीय म्हणजे, भाजपमध्ये उपमुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरू आहे. प्रेमकुमार यांच्यासोबत अनेक दावेदारांनी उपमुख्यमंत्रीपदावर दावा केलाय. वाचा : वाचा : बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदीच? उपमुख्यमंत्री जवळपास १३ वर्षांपासून बिहारमध्ये या पदाची जबाबदारी हाताळत आहेत. यंदाही तेच या पदाचे महत्त्वाचे दावेदार आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याशी जवळचे संबंध आणि सामंजस्यामुळे त्यांची या पदासाठीची दावेदारी आणखीनच मजबूत झालीय. एनडीए बैठकीपूर्वी सुशील कुमार मोदी यांनी दिल्लीलाही एक धावती भेट दिल्याचं समजतंय. दिवाळीच्या दिवशी बिहारमध्ये परतलेल्या पत्रकारांना मात्र कोणतही उत्तर देण्यापासून ते लांबच राहिले. वाचा : वाचा : यांचाही दावा संघाचे जुने नेते कामेश्वर चौपाल यांनाही आता उपमुख्यमंत्री पदासारख्या महत्त्वाच्या पदाची अपेक्षा आहे. कामेश्वर चौपाल अचानक पाटणामध्ये दाखल झाले. यावेळी, मीडियाशी बोलताना पक्ष जी जबाबदारी देणार त्याचा स्वीकार करणार असल्याचं त्यांनी म्हटलं. परंतु, त्यांची उपमुख्यमंत्री पदाची अपेक्षा मात्र लपून राहिलेली नाही. आता, बिहारचा पुढचा उपमुख्यमंत्री कोण असेल? प्रेमकुमार, कामेश्वर चौपाल की सुशील कुमार मोदी हे एनडीच्या बैठकीनंतरच समजू शकेल. वाचा : वाचा :