आव्हान मिळालं की मला जास्त स्फूर्ती मिळते; ठाकरेंचा रोख कुणाकडे? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, November 26, 2020

आव्हान मिळालं की मला जास्त स्फूर्ती मिळते; ठाकरेंचा रोख कुणाकडे?

https://ift.tt/37b2sfO
मुंबई: 'आव्हान मिळालं की मला जास्त स्फूर्ती मिळते. आडवे येणाऱ्यांना आडवं करून महाराष्ट्र पुढे जाईल,' असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. हा इशारा नेमका कोणासाठी आहे आणि मुख्यमंत्री ठाकरे यांचा रोख नेमका कोणाकडे आहे, याविषयी आता चर्चेला उधाण आलं आहे. राज्यातील या महिन्यात एक वर्ष पूर्ण करत आहे. त्या निमित्तानं 'सामना'चे कार्यकारी संपादक, खासदार यांनी उद्धव ठाकरे यांची खास मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत महाराष्ट्र सरकारच्या एक वर्षाच्या कार्यकाळाचा आढावा घेतानाच राऊत यांनी विचारलेल्या राजकीय प्रश्नांनाही मुख्यमंत्र्यांनी सडेतोड उत्तरं दिली आहेत. उद्या प्रसारित होणाऱ्या या मुलाखतीचा प्रोमो राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. वाचा: नोव्हेंबर २०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार आलं. हे सरकार स्थिर होईपर्यंत करोनाची महासाथ आली. चक्रीवादळ आलं. या नैसर्गिक संकटांचा सामना करत असतानाच राज्यात राजकीय घडामोडीही सातत्यानं घडत होत्या. सरकार पडण्याचे मुहूर्त विरोधकांकडून दिले जात होते. आजही ती भाकितं केली जात आहेत. या सगळ्या घडामोडींवर उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीत भाष्य केल्याचं प्रोमोतून दिसत आहे. उद्धव ठाकरे यांच्या फेसबुक लाइव्हवर विरोधक सातत्यानं टीका करत असतात. मुख्यमंत्री हे हात धुवा असं सांगण्यापलीकडं काय करतात, असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे. त्यावर बोलताना, 'हात धुतो आहे. जास्त अंगावर याल तर हात धुवून मागे लागेन,' असं उत्तर उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. राऊतांनी ट्वीट केलेल्या या प्रोमोमुळं मुलाखतीची उत्सुकता वाढली आहे. वाचा: