धक्कादायक! क्रिकेटपटूने २१व्या वर्षी केली आत्महत्या - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, November 16, 2020

धक्कादायक! क्रिकेटपटूने २१व्या वर्षी केली आत्महत्या

https://ift.tt/2IEImCm
ढाका: बांगलादेशच्या १९ वर्षाखालील संघाकडून खेळणारा माजी क्रिकेटपटू याचे २१ वर्षी निधन झाले. दुर्गापूर येथील स्थानिक पोलिसांनी मोहम्मदने आत्महत्या केल्याचे सांगितले. वाचा- मोहम्मद शोजिब हा फलंदाज होता. त्याने २०१७-१८ मध्ये ढाका प्रिमियर लीग मध्ये भाग घेतला होता. तो शाइनपूकूर क्रिकेट क्लबकडून खेळायचा. शोजिबने बांगलादेशकडून तीन युथ वनडे देखील खेळले होते. २०१८च्या १९ वर्षाखालील क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये तो राखीव खेळाडू होता. बोर्डाचे संचालक खालिद महमूद यांनी शोजिब एक प्रतिभावंत क्रिकेटपटू होता असे सांगितले. खालिद हे बांगलादेश ट्रॅक अकादमीचा हेड कोच होते तेव्हा शोजिबने २००८ साली ट्रेनिंग सुरू केली होती. वाचा- शोजिबच्या आत्महत्येची बातमी ऐकून विश्वास बसत नाही. ही अतिशय वाइट बातमी आहे, असे महमूद म्हणाले. तो एक सलामीचा फलंदाज होता आणि धीम्यागतीने गोलंदाज करत होता. राजशाही क्रिकेट क्लबकडून खेळणारा त्याचा सहकारी तन्मय घोष म्हणाला, मला नेहमी वाटत होते की तो दिर्घकाळ क्रिकेट खेळेल. तो नेहमी मेहनत घ्यायचा. या बातमीने मला धक्का बसलाय.