'महाराष्ट्राच्या मंत्रालयाचा नवीन पत्ता 'कृष्णकुंज'' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, November 16, 2020

'महाराष्ट्राच्या मंत्रालयाचा नवीन पत्ता 'कृष्णकुंज''

https://ift.tt/3lBIsbY
मुंबईः करोना संकटाच्या काळात विविध क्षेत्रातील लोकांनी आपल्या समस्या मनसे अध्यक्ष यांच्याकडे मांडल्या आहेत. नसेकडे सत्ता नसतानाही विविध क्षेत्रातील लोक राज ठाकरे यांना सतत भेटत असतात. यावरुन मनसे नेते संदिप देशपांडे यांनी राज्य सरकारला टोला लगावला आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेक क्षेत्रातील लोकांनी राज ठाकरे यांच्यासमोर अडचणींचा पाढा वाचला होता. तर, राज यांनींही सरकारसोबत संपर्क साधून या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला होता. मुंबईच्या डबेवाल्याचा प्रश्न असो किंवा ११वीचे प्रवेश असो. याविषयी राज ठाकरे यांनी तात्काळ मदत केल्याचं पाहायला मिळतंय. यावरूनच मनसे नेते संदिप देशपांडे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. समस्या अनेक उपाय एक, महाराष्ट्राच्या मंत्रालयाचा नवीन पत्ता 'श्री राजसाहेब ठाकरे कृष्णकुंज शिवाजी पार्क, दादर, मुंबई २८,' असं ट्विट देशपांडे यांनी केलं आहे. संदिप देशपांडे यांचं हे ट्विट सध्या चर्चेचा विषय ठरतेय. दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात जिम चालक-मालक, थिअटर चालक-मालक, सलून व्यावसायिक, हॉटेल मालक-चालक, मुंबईतील डबेवाले अशा विविध क्षेत्रातील लोकांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. करोनानंतरच्या लॉकडाऊनमुळं येणाऱ्या अडचणी त्यांनी राज यांच्यापुढं मांडल्या होत्या. तसंच, याबाबत आवाज उठवण्याची मागणी केली होती. त्यांच्या मागण्यांसाठी पाठपुरावा करण्याचं व प्रसंगी आंदोलन करण्याचं आश्वासन राज यांनी दिलं होतं.