अॅपबंदीने चीनचा जळफळाट; भारतावर केला 'हा' आरोप - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, November 26, 2020

अॅपबंदीने चीनचा जळफळाट; भारतावर केला 'हा' आरोप

https://ift.tt/36744Ic
बीजिंग: राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्यामुळे भारताने आणखी ४३ घातली. भारताने पुन्हा एकदा केलेल्या डिजीटल स्ट्राइकमुळे चीनचा जळफळाट झाला आहे. चीनने या अॅपबंदीचा विरोध केला आहे. या निर्णयामुळे जागतिक व्यापारी संघटनेच्या (डब्ल्यूटीओ) नियमांचा भंग होत असल्याचा आरोप चीनने केला आहे. पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष ताबा रेषेवरील तणावानंतर, केंद्र सरकारने जूनमध्ये आणि सप्टेंबर महिन्यात चीनच्या अॅपवर बंदी घातली होती. त्यानंतर पुन्हा एकदा मंगळवारी ४३ अॅपवर बंदी घातली. यामध्ये 'अलिबाबा ग्रुप'च्या 'अली एक्स्प्रेस' या अॅपचाही समावेश आहे. या अॅपमध्ये काही डेटिंग अॅपचाही समावेश आहे. देशाची सार्वभौमता आणि अखंडता यांना या अॅपमुळे धोका असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी या निर्णयांवर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, 'भारताने जूननंतर चौथ्यांदा राष्ट्रीय सुरक्षेचे कारण देऊन चीनच्या अॅपवर बंदी घातली आहे. बाजारपेठेची तत्त्वे आणि जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांचा हा भंग असून, चिनी कंपनीचे हितसंबंध आणि वैध अधिकारांवर यामुळे गदा येत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यवसाय करीत असताना, आंतरराष्ट्रीय नियम, स्थानिक कायदे व नियमांचे पालन करण्याची सूचना आम्ही कायमच चिनी कंपन्यांना करत असतो असेही त्यांनी सांगितले. वाचा: वाचा: वाचा: भारताने बंदी घातलेल्या अ‍ॅप्समध्ये अलीबाबा वर्कबेंच, स्नॅक व्हिडिओ, कॅमकार्ड, टायनिजी सोशल, वीडेट(डेटिंग अ‍ॅप), फ्री डेटिंग अ‍ॅप, डेट माय एज, ट्रॅली चायनीज, मँगो टीव्ही, बॉक्स स्टार, हॅप्पी फिश आदी अॅप्सचा समावेश आहे. याआधी भारताने २०० चिनी अॅपवर बंदी घातली होती. त्यामध्ये बाइटडान्स कंपनीच्या टिकटॉकचाही समावेश आहे. टिकटॉक बंदीमुळे बाइटडान्सला अब्जावधींचे आर्थिक नुकसान झाले.