
नवी दिल्ली : केंद्र सरकारनं विरोधकांचा विरोध झुगारत देशभरात लागू केलेल्या कृषी कायद्याविरोधात पंजाब आणि हरयाणाचे हजारो शेतकरी 'दिल्ली चलो' आंदोलनात सहभागी झाले आहेत. दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांना मोर्चाची परवानगी नाकारली आहे. त्यामुळे शेतकरी आणि शासकीय यंत्रणा यांच्यात पुन्हा एकदा धुमश्चक्री उडण्याची शक्यता आहे. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यसााठी राजधानीच्या सीमेवर मोठी करण्यात आलीय. शेतकऱ्यांना दिल्लीत घुसू देऊ नये, असे निर्देशच पोलिसांना देण्यात आलेले आहेत. सध्या, शेतकरी जवळ पोहचलेले आहेत. फरीदाबादमध्ये कलम १४४ लागू करण्यात आलंय. शेतकऱ्यांनी अन्न-पाणी सोबत घेऊनच राजधानीकडे कूच केलीय. जिथे पोलीस थांबवतील तिथेच ठाण मांडून बसण्याची योजना शेतकऱ्यांनी आखलीय. दिल्लीला लागून असलेल्या पंजाब, हरयाणा आणि उत्तर प्रदेशच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. अशा वेळी शेतकऱ्यांनी मंगळवारी गावांतील रस्त्यावरून घुसण्याचा प्रयत्न केला. पर त्यांना पोलिसांनी रोखलं. कोणत्याही आंदोलनात सहभागी होऊ नये, असं फर्मानचं पोलिसांकडून शेतकऱ्यांसाठी काढण्यात आलंय. इतर राज्यांतून दिल्लीत शेतकरी आले तर त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल, असंही पोलिसांनी म्हटलंय. पोलिसांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, पंजाबहून जवळपास २,००,००० (दोन लाख) शेतकरी २६ नोव्हेंबरपासून 'दिल्ली चलो' आंदोलनांतर्गत दिल्लीला रवाना होण्यासाठी तयार आहेत. शेतकऱ्यांच्या प्रदर्शनामुळे अनेक ठिकाणी जाम लागण्याची शक्यता आहे. वाचा : वाचा :
सेवांवर आंदोलनाचा परिणाम? - २६ आणि २७ नोव्हेंबर रोजी हरयाणा ते पंजाबसाठी रोडवेज सेवा बंद ठेवण्यात आलीय - २६ आणि २७ नोव्हेंबर रोजी चंदीगड ते हरयाणा बससेवाही बंद राहील - फरीदाबादमध्ये कलम १४४ लागू करण्यात आलंय - दिल्ली मेट्रो संचालनातही अनेक बदल करण्यात आलेत. डीएमआरसीनुसार, गुरुवारी दुपारी २.०० वाजेपर्यंत दिल्ली मेट्रोच्या सर्व लाईनवर काही मोजक्या स्टेशन्स दरम्यान सेवा बंद राहील. यामुळे दिल्ली सीमेवरील भागांतील मेट्रो सेवेवर प्रभाव पडेल. वाचा : वाचा :
