पुणे: मनसेचा मोर्चा, शहरप्रमुखांसह कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, November 26, 2020

पुणे: मनसेचा मोर्चा, शहरप्रमुखांसह कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

https://ift.tt/3fzd9wx
पुणे: वाढीव वीजबिलाविरोधात मनसेच्या आंदोलनाआधीच पोलिसांनी शहरप्रमुख अजय शिंदे यांच्यासह ५०-६० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. फरासखाना पोलीस ठाण्यात त्यांना घेऊन गेले. त्यामुळे आक्रमक झालेल्या मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या मांडला. वाढीव माफ करावे या मागणीसाठी मनसेकडून आज, बुधवारी पुण्यातील शनिवारवाडा ते जिह्याधिकारी कार्यालय या दरम्यान मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते येथे येणार असल्याचे लक्षात आल्याने मनसेचे शहरप्रमुख अजय शिंदे यांना काल सायंकाळी पोलीस प्रशासनाने नोटीस बजावली होती. आज सकाळी आंदोलनाच्या वेळी कार्यकर्ते व शिंदे आंदोलनस्थळी पोहोचताच, त्यांना फरासखाना पोलिसांनी ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेले. त्यानंतर कार्यकर्ते आक्रमक झाले. पोलिसांनी ५० ते ६० कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेतले. त्यानंतर आंदोलनस्थळी मनसेचे नेते राजेंद्र उर्फ बाबू वागसकर, रूपाली पाटील ठोंबरे यांनी मनसैनिकांसह पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला. जिल्हाधिकाऱ्यांना येथे बोलवा या मागणीच्या घोषणा करत आंदोलक ठाण मांडून आहेत. जोपर्यंत आमचे निवेदन जिल्हाधिकारी स्वीकारत नाहीत, तोपर्यंत येथून हलणार नाही अशी आग्रही भूमिका मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घेतली आहे.