
नवी दिल्ली: फुटबॉल जगातील महान खेळाडू () यांचे बुधवारी निधन झाले. फुटबॉल जगतातील सर्व चाहत्यांच्या मनात घर करणाऱ्या मॅराडोनाच्या निधनामुळे सर्व सामान्य चाहत्यापासून ते फुटबॉलपटू देखील शोक व्यक्त करत आहेत. फक्त चांगला खेळाडू नाही तर एक उत्तम प्रशिक्षक म्हणून त्यांनी स्वत:ची छाप उमठवली होती. सध्या फुटबॉलमधील आघाडीचा खेळाडू मेसीचा ते मेंटॉर देखील होते. त्याशिवाय कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ते चर्चेत राहिले. वाचा- अर्जेंटिनाच्या या महान खेळाडूने १९८६ साली फिफा वर्ल्डकप जिंकला. मॅराडोनाने फुटबॉल विश्वाला अनेक असे क्षण दिले जे आज देखील आठवले जातात. यातील सर्वात मोठी अशी आठवण म्हणजे, इंग्लंड विरुद्ध करकणयात आलेला गोल ऑफ द सेंच्यूरी होय. ६० यार्डहून पळत येत त्याने इंग्लंडच्या मिडफिल्डला चुकवत गोल केला होता. दिएगो मॅराडोना १९६० ते २०२० >> प्रतिनिधित्व :अर्जेंटिना, नापोली, बोका ज्युनियर्स, बार्सिलोना >>९१ आंतरराष्ट्रीय सामने आणि ३४ गोल >>१६व्या वर्षी आंतरराष्ट्रीय पदार्पण >>चार वर्ल्डकपमध्ये सहभाग >>१९८६मध्ये गोल्डन बॉलचा मान >>इंग्लंडविरुद्ध केलेला गोल ठरला शतकातील सर्वोत्तम गोल >> २००८मध्ये अर्जेंटिनाचे प्रशिक्षक >> बार्सिलोनात खेळताना ५० लाख पौंडचा विश्वविक्रमी करार नंतर नापोलीकडून खेळण्यासाठी ७० लाख पौंडांचा करार. पाहूयात मॅराडोनाने मारलेले अफलातून गोल एसी मिलानविरुद्धचा धमाकेदार गोल गोल ऑफ द सेंच्युरी हॅड ऑफ गॉड मॅराडोनाचे टॉप ५ गोल