ऐन स्पर्धा सुरू असताना ICCने नियम बदलला; भारताने अव्वल स्थान गमावले! - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, November 22, 2020

ऐन स्पर्धा सुरू असताना ICCने नियम बदलला; भारताने अव्वल स्थान गमावले!

https://ift.tt/2IWVaUy
नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) () (२०१९-२१) च्या रॅकिंग सिस्टममध्ये बदल केले आहेत. या बदलाचा फटका भारतीय संघाला बसला आहे. जी क्रमवारीत पहिल्या स्थानावर होती. पण आता बदललेल्या नियमामुळे त्यांना पहिले स्थान गमवावे लागले आहे. करोना व्हायरसमुळे कसोटी मालिका रद्द झाल्या असतील तर त्याचा फटका कोणत्याही संघाला बसता कामा नये, अशी शिफारस अनिल कुंबळेच्या अध्यक्षतेखालील समितीने आयसीसीला दिली होती. आता असा प्रश्न निर्माण होतो की, हे नवे बदल आहेत तरी काय? यामुळे कोणत्या गोष्टी बदलल्या आहेत आणि संघांवर त्याचा काय परिणाम होणार? जाणून घेऊयात या सर्व प्रश्नांची उत्तरे... वाचा- काय बदल झाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा गुणतक्ता आता पर्सेंटेज ऑफ पॉइंट्स (POP)च्या आधारे केले जाणार आहे. POP म्हणजेच कोणत्याही संघाद्वारे एक मालिकेत जिंकल्या गेलेल्या पॉइंट्सची टक्केवारी होय. उदाहरणासाठी भारतीय संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये चार मालिका खेळल्या आहेत. या काळात भारताने ४८० पैकी ३६० गुण मिळवले. याचा अर्थ भारताचे पर्सेंटेज ऑफ पॉइंट्स ७५ इतके झाले. वाचा- आता या नव्या पद्धतीमुळे पहिल्या स्थानावर कशी काय पोहोचली हे जाणून घेऊ. ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये ३ मालिका खेळल्या आहेत. या काळात त्यांनी ३६० पैकी २९६ गुण मिळवलेत. त्याचा पर्सेंटेज ऑफ पॉइंट्स ८२.२२ इतका झाला. हा भारतापेक्षा अधिक आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्येमध्ये प्रत्येक संघाला सहा कसोटी मालिका खेळायच्या आहेत. या काळात कोणताही संघ जास्तीत जास्त ७२० गुण मिळवू शकतो. जर संघाने सहा मालिकेत ४८० गुण मिळवले तर त्यांचा पीओपी ६६.६७ टक्के इतका होईल. जर एखादा संघ पाच मालिका खेळत असेल आणि त्यांनी ६०० पैकी ४५० गुण मिळवले तर पीओपी ७५ टक्के इतका होईल. तो संघ ज्या संघाने सहा मालिका खेळल्या आहेत त्यांच्यापेक्षा पुढे जाईल. आधीचा नियम काय होता? ICCने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची घोषणा केली होती तेव्हा असे सांगितले गेले होते की, एका कसोटी मालिकेत संघाला अधिकतर १२० गुण मिळवता येतील. एक संघ सहा मालिका खेळेल आणि त्यापैकी ३ मालिका घरच्या मैदानावर आणि ३ परदेशात होतील. एकूण एक संघ जास्तीत जास्त ७२० गुण मिळवू शकतील. दोन सामन्यांच्या मालिकेत एक विजयासह ६० गुण तर ३ सामन्यांच्या मालिकेत ४० गुण अशाच पद्धतीने ४ सामन्यांच्या मालिकेत एका विजयासाठी संघाला ३० गुण मिळतील. पाच सामन्यांची मालिका असेल तर २४ गुण. जर सामना टाय झाला तर दोन्ही संघांना समान गुण मिळतील आणि जर कसोटी ड्रॉ झाली तर एकूण गुणाच्या एक तृतियांश दोन्ही संघांना मिळतील. याचा अर्थ भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आगामी मालिकेत विजयासाठी ३० गुण, टायसाठी १५ तर ड्रॉ झाल्यावर १० गुण मिळतील. न्यूझीलंड बिघडवू शकते भारताचे गणित.... वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये अव्वल दोन स्थानात कोणताही बदल होण्याची शक्यता कमी आहे. पण न्यूझीलंड आणि इंग्लंड हे संघ भारतासाठी अडचणी निर्माण करू शकतात. न्यूझीलंडला दोन कसोटी मालिका खेळायच्या आहेत आणि त्या दोन्ही त्यांच्यात देशात होणार आहेत. ही मालिका वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान विरुद्ध होणार आहेत. ही मालिका प्रत्येकी २ सामन्यांची आहे. याचा अर्थ न्यूझीलंडला २४० गुण मिळवण्याची संधी आहे. या उटल भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार आणि पुढील वर्षी इंग्लंड विरुद्ध पाच सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दोन्ही मालिकेचा निकाल भारताच्या बाजूने लागला नाही तर विराट आणि कंपनीसाठी अडचणीचे ठरू शकते.