
सर्वसामान्य नागरिकांना आलेल्या वाढीव वीज बिलांच्या विरोधात मनसेनं आज मोर्चाचं आयोजन केलं आहे. अनेक शहरांत पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली असली तरी कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. लाइव्ह अपडेट्स: >> मनसेचे ठाणे-पालघर अध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह अभिजित पानसे व अन्य पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात. >> ठाणे: पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर आता नौपाडा येथून निघणार मनसेचा मोर्चा. कॅडबरी जंक्शन ते जिल्हाधिकारी कार्यालय असा निघणार होता मोर्चा >> गडबड, तोडफोड नको. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा; राज ठाकरे यांची कार्यकर्त्यांना सक्त ताकीद >> पोलिसांना सहकार्य करण्याच्या राज ठाकरे यांच्या आंदोलनकांना सूचना >> पुणे: फरासखाना पोलीस स्टेशनच्या दारात कार्यकर्त्यांचा ठिय्या >> पुणे: मनसेचे अनेक कार्यकर्ते ताब्यात >> पुणे: आंदोलनाआधीच मनसेचे शहरप्रमुख अजय शिंदे यांना पोलिसांनी घेतले ताब्यात >> नाशिक: कार्यालयापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा >> नाशिक: पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली. आता गटागटात कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार मोर्चा >> नाशिक: मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून नोटीस पाठवण्यात आल्याने मोर्चाकडे लक्ष >> मनसेचे कार्यकर्ते मोर्चा काढण्यावर ठाम >> मुंबई, औरंगाबाद, ठाण्यात मनसेच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली >> मुंबईसह ठिकठिकाणच्या जिल्हाधिकारी कार्यालयांवर काढणार मोर्चा >> लॉकडाऊन काळात आलेल्या वाढीव वीज बिलांविरोधात मनसेचा आज झटका मोर्चा