रणबीर म्हणतो लवकरच करणार लग्न; पण आलिया म्हणते.... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, December 25, 2020

रणबीर म्हणतो लवकरच करणार लग्न; पण आलिया म्हणते....

https://ift.tt/3nPdDSt
मुंबई: बॉलिवूडमधलं सगळ्यात हॅपनिंग कपल म्हणजे अभिनेत्री आणि अभिनेता . दोघांच्या अफेअर्सबद्दल सतत बोललं जातं. त्यांच्या लग्नाबद्दलच्या अफवा तर अधूनमधून डोकं वर काढत असतात. याबद्दल रणबीर कधीच काहीच बोलत नाही. पण, यावेळी तो गप्प बसला नाहीय. 'करोना नसता तर आतापर्यंत आलियाशी लग्नगाठ बांधली असती. पण, लवकरच चाहत्यांना आनंदाची बातमी देऊ', असं रणबीरनं नुकतंच एका मुलाखतीत म्हटलंय. या दोघांचं लग्न नवीन वर्षात होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहेच. तसंच माझी गर्लफ्रेंड आलिया प्रत्येक क्षेत्रात पुढं आणि यशस्वी आहे. लॉकडाऊनमध्ये तिनं गिटार वाजण्यापासून ते पटकथा लेखनाचे ऑनलाइन क्लास लावले होते, असं म्हणत रणबीरनं आलियाचं कौतुक केलं आहे. आता रणबीरच्या या वक्तव्यामुळं पुन्हा एकदा हा चर्चेचा विषय ठरणार आहे. पण आलिया म्हणचे इतक्याच नाही! आणि रणबीरच्या नात्याची चर्चा खूप दिवसांपासून सुरू आहे. अनेक कार्यक्रमांत ते दोघे एकत्र दिसतात. त्यामुळं लवकरच त्यांचं शुभमंगल होणार असल्याच्या बातम्या येत असतात. नुकत्याच एका मुलाखतीत आलिया लग्नाबद्दल विचारलं असता तिनं इतक्यात काही ठरवलं नसल्याचं म्हटलं आहे. 'खरं सांगायचं झालं तर मी याबाबत अजून विचार केला नाही. मी फक्त २५ वर्षांची आहेच. योग्य वेळ येईल तेव्हा सर्व गोष्टी होतील.', असं आलिया म्हणाली. त्यामुळं त्यांचे चाहते काहीसे गोंधळले आहेत. आलिया आणि रणबीर लवकरच 'ब्रह्मास्त्र' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. दोघांचा एकत्रित असा हा पहिला सिनेमा आहे. पुढच्यावर्षी हा सिनेमा प्रदर्शित होणार असून यात अमिताभ बच्चन यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. ब्रह्मास्त्र सिनेमानंतर आलिया करण जोहरच्या 'तख्त' आणि 'संजय लीला भंसाली दिग्दर्शित 'गंगूबाई काठीयावाडी' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.