संतापजनक! माथेफिरू तरुणाने १६ वर्षीय मुलीला डांबले; रात्रभर बलात्कार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, December 31, 2020

संतापजनक! माथेफिरू तरुणाने १६ वर्षीय मुलीला डांबले; रात्रभर बलात्कार

https://ift.tt/2WUEi4m
कानपूर: उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एका १६ वर्षीय मुलीला घरात डांबून तिच्यावर रात्रभर केल्याचा आरोप एका तरुणावर करण्यात आला आहे. या माथेफिरू तरुणाने तिला बेदम मारहाणही केली. पीडितेने कशीबशी त्याच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेतली. त्यानंतर सर्व हकिकत आपल्या कुटुंबीयांना सांगितली. त्यानंतर पीडितेने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सचेंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात ही घटना घडली. मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास मुलगी शेताच्या दिशेने गेली होती. तेथून परतताना गावातीलच राहुलने तिला गाठले. महत्वाचे काम असल्याची बतावणी करून तिला घरी घेऊन गेला. त्यानंतर त्याने तिला घरात डांबून ठेवले. तिला मारहाण केली. त्यानंतर रात्रभर तिच्यावर बलात्कार केला. घराबाहेर पडलेली मुलगी बराच वेळ झाला तरी, परतली नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. कुटुंबीय आणि शेजारी संपूर्ण रात्रभर गावाबाहेर, जंगल परिसरात तिचा शोध घेत होते. मात्र, ती कुठेच सापडली नाही. बुधवारी सकाळी पीडित मुलगी घरी पोहोचली. तिची अवस्था बघून कुटुंबीयांना धक्काच बसला. पीडिता घरी पोहोचल्यानंतर तिची अवस्था बघून कुटुंबीय हादरले. तिने घडलेला सर्व प्रकार त्यांना सांगितला. आरोपीने तिला बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत तिच्या शरीरावर व्रण आले होते. पीडितेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरोधात एफआयआर दाखल केला आहे. पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. पुढील कारवाई करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.