सराफाच्या दुकानात तीन महिला शिरल्या, सोन्याच्या बांगड्या लांबवल्या - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, December 20, 2020

सराफाच्या दुकानात तीन महिला शिरल्या, सोन्याच्या बांगड्या लांबवल्या

https://ift.tt/3paNhdW
म. टा. प्रतिनिधी, : लक्ष्मी रस्त्यावरील एका सराफाच्या दुकानात खरेदीच्या बहाण्याने शिरलेल्या तीन महिलांनी सराफाचे लक्ष चुकवून एक लाख ७० हजारांच्या सोन्याच्या बांगड्या लांबविल्याची घटना समोर आली. या प्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत सराफ व्यावसायिकाने तक्रार दिली. त्यानुसार तीन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार सराफ व्यावसायिकाचे लक्ष्मी रस्त्यावरील कुंटे चौकात बी. एन. अष्टेकर नावाचे सराफी दुकान आहे. आठवड्यापूर्वी तीन महिला दुपारी खरेदीच्या बहाण्याने दुकानात शिरल्या. या तिन्ही महिलांनी बुरखा परिधान केला होता. त्यानंतर त्यांनी व्यावसायिकाच्या मुलाकडे दागिने खरेदी करणार असल्याचा बहाणा केला. त्यानंतर नजर चुकवून त्यांनी सोन्याच्या बांगड्यांच्या ट्रेमधून दोन बांगड्या चोरल्या. चोरलेल्या दोन बांगड्यांची किंमत एक लाख ७० हजार रुपये आहे. दुकान बंद करतेवेळी सोन्याची माहिती घेत असताना ऐवज कमी आढळून आल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक विजय जाधव अधिक तपास करीत आहेत.