करोनावर लपवाछपवी; चीनने 'अशा' दडपल्या नकारात्मक बातम्या! - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, December 21, 2020

करोनावर लपवाछपवी; चीनने 'अशा' दडपल्या नकारात्मक बातम्या!

https://ift.tt/3arfau9
न्यूयॉर्क: देशात करोनाचा फैलाव सुरू झाल्यानंतर चीनने अनेक बातम्या दडपल्याचा आरोप करण्यात येत होता. करोनाविषयक नकारात्मक बातम्या दडपण्याच्या धोरणाद्वारे चीनने करोनासाथीच्या सुरुवातीच्या काळात जगाला या माहितीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी समाजमाध्यमांवर निर्बंध लादण्यात आले, अशा आशयाचे वृत्त ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने दिले आहे. आता या आरोपांना बळ देणारे वृत्त अमेरिकन प्रसारमाध्यमांनी दिल्याने पुन्हा एकदा चर्चेला तोंड फुटण्याची शक्यता आहे. कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक बातम्या पसरवू नयेत, अशी तंबीच या माध्यमांना देण्यात आली होती. वुहानमधील करोना विषाणूची माहिती जगाला सर्वप्रथम देणारे डॉ. ली वेनलियांग यांच्या मृत्यूची बातमी गेल्या वर्षी सात फेब्रुवारीला वाऱ्यासारखी पसरली. अडचणीत आणणाऱ्या बातम्या दडपून टाकण्याच्या चीनच्या प्रवृत्तीचा फार मोठा फटका ली वेनलियांग यांच्या मृत्यूच्या रूपाने बसला. तरीही, चिनी प्रशासनाने निर्बंधांमध्ये वाढच केली. अडचणीच्या आणि नकारात्मक बातम्या दडपण्याबरोबरच प्रचारकी आणि सोयीस्कर माहिती पेरणाऱ्या बातम्या पसरविण्याचे गुप्त आदेशही देण्यात आले, असे या वृत्तात म्हटले आहे. त्यानंतर तातडीने चीनमधील इंटरनेट नियामकांनी या विषयीची अधिसूचना बंद करण्याची सूचना वृत्तविषयक वेबसाइटना केली. तसेच, ट्रेंडिंग विषयांतून ही बातमी काढण्याचे आदेशही चिनी समाजमाध्यम साइटना देण्यात आले. वाचा: ‘न्यूयॉर्क टाइम्स’ आणि ‘प्रो पब्लिका’यांच्याकडे अशा प्रकारच्या शेकडो आदेशांच्या प्रती उपलब्ध आहेत. ‘सीसीपी अनमास्क्ड्’ नावाच्या एका हॅकर गटाने ही कागदपत्रे ‘न्यूयॉर्क टाइम्स’ आणि ‘प्रो पब्लिका’ला दिली, अशी माहिती वृत्तात देण्यात आली आहे. या आदेशांमुळे चीनने करोळाकाळात कशाप्रकारे सोयीस्कर माहिती प्रसृत केली, यावर उजेड पडतो. सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाला योग्य वाटेल, अशाच पद्धतीचा मजकूर या काळात चिनी इंटरेनट माध्यमांवर प्रसृत होत होता. त्यामुळे चिनी माध्यमांवर दिसणारी वृत्ते सरकारने आधीच सेन्सॉर केलेली असत. या बातम्यांचे स्वरूप कसे असावे, त्यांचा सूर कसा असावा, याचे निकषच अधिकाऱ्यांनी घालून दिले होते. वााच: वाचा; सोशल मीडियातही आवाज दडपला कम्युनिस्ट पक्षाच्या विरोधी मतप्रदर्शन करणाऱ्यांच्या मागे भाडोत्री ट्रोलर लावले जात, तसेच सुरक्षा यंत्रणांच्या माध्यमातून त्यांचा आवाज दाबून टाकला जात असे. गेल्या वर्षी जानेवारीपासूनच चीनमध्ये इंटरनेटवरील निर्बंधांना सुरुवात झाली. तेव्हा तर करोना विषाणूविषयी ठोस माहितीही उपलब्ध नव्हती. साथीचा फैलाव जसा वाढू लागला, तसे अधिकाऱ्यांनी इंटरनेटवर निर्बंध आणून या आजाराच्या हाताळणीबाबत कोणतीही नकारात्मक बातमी देण्यास मनाईच केली. वाचा: अमेरिकेच्या आरोपावर शिक्कामोर्तब चीनने साथीच्या प्रारंभिक काळात ही माहिती जगापासून दडवून ठेवली, असा आरोप अमेरिका आणि इतर देश सातत्याने करत होते. चिनी अधिकाऱ्यांनी साथीचे गांभीर्य कमी करण्याचा प्रयत्न केला; तसेच सारे आलबेल असल्याची खोटी माहिती प्रसृत केली, यावर कागदपत्रांच्या आधारे शिक्कामोर्तब झाले. साऱ्या जगाच्या नजरा चीनकडे लागल्या असताना, हा विषाणू फारसा घातक नाही आणि परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन सक्षम असल्याचे चित्र रंगविण्यात आले.