इंधन दर ; सलग १४ व्या दिवशी कंपन्यांनी घेतला हा निर्णय - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, December 21, 2020

इंधन दर ; सलग १४ व्या दिवशी कंपन्यांनी घेतला हा निर्णय

https://ift.tt/3rcXRTs
मुंबई : अनलॉकमुळे बाजारपेठा खुल्या झाल्या असून देशातील इंधन मागणी वाढत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या मागणीत जुलैमध्ये मोठी घसरण झाली होती. मात्र मागील महिनाभरात त्यात सुधारणा झाली असून पेट्रोलियम कंपन्यांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होत असली तरी तूर्त कंपन्यांनी इंधन दर जैसे थे ठेवले आहेत. आज मुंबईत पेट्रोलचा भाव एक लिटरसाठी ९०.३४ रुपये आहे. डिझेलचा भाव ८०.५१ रुपये आहे. दिल्लीत पेट्रोलने ८३ रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. दिल्लीत पेट्रोलचा भाव ८३.७१ रुपये झाला आहे. डिझेलचा भाव ७३.८७ रुपये आहे. त्याशिवाय चेन्नईत देखील आज पेट्रोल आणि डिझेलमध्ये वाढ झाली आहे. पेट्रोलचा भाव ८६.५१ रुपये झाला असून ७७.४४ रुपये झाले आहे. कोलकात्यात एक लिटर पेट्रोलचा भाव ८५.१९ रुपये असून डिझेल ७७.४४ रुपये आहे. सिंगापूरमध्ये आज सोमवारी कच्च्या तेलाच्या भावात किरकोळ घसरण झाली आहे. प्रती बॅरल ८३ सेंट्सने घसरला आणि ४८.२७ डॉलर झाला. ब्रेंट क्रूडचा भाव ९७ सेंट्सने घसरला आणि ५१.२९ डॉलर झाला. त्याआधी सात आठवडे तेलाचा भाव तेजीत आहे. ज्यामुळे तेलाचा भाव ५० डॉलरवर गेला आहे. अमेरिकन पेट्रोलियम इन्स्टिट्यूटनुसार ११ डिसेंबर २०२० रोजी संपलेल्या आठवड्यात तेल साथ ३.१ दशलक्ष बॅरल आहे. एप्रिल महिन्यात साथीच्या उद्रेकामुळे मागणीवर परिणाम झाला, त्यामुळे ऐतिहासिक निचांक गाठल्यानंतर तेलाने सुधारणा दर्शवली. ओपेक अर्थात ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रिज व सदस्य राष्ट्रांनी निक्रमी उत्पादन कपात केल्याने तेल बाजारात संतुलन राखले गेले. जानेवारी महिन्यात ओेपेक समूह पुरवठ्यावरील निर्बंध कमी करणार असून ५००,००० बॅरल प्रतिदिन एवढी पुरवठ्यात भर पडेल. तेल बाजाराला आणखी आधार मिळण्यासाठी ही पुरवठ्यातील वाढ कमी गतीने करण्यात येईल.