हजारो कोटींच्या मालकीण; 'या' आहेत देशातील टॉप १० श्रीमंत उद्योजिका - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, December 31, 2020

हजारो कोटींच्या मालकीण; 'या' आहेत देशातील टॉप १० श्रीमंत उद्योजिका

https://ift.tt/3aXz2Fo
मुंबई : भारताला २०२५ सालापर्यंत आपली अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन अमेरिकन डॉलरची उलाढाल करणारी करायची असेल तर हे ध्येय साध्य करण्यासाठी महिलांना संपत्ती निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत राहावी लागणार आहे. २०२० मध्ये आघाडीच्या उद्योजिकांच्या संपत्तीत वाढ झाली आहे. कोटक वेल्थ हुरून - लीडिंग वेल्दी विमेन २०२० या अहवालात आढावा घेण्यात आलेल्या महिलांपैकी ३८ महिलांकडे किमान एक हजार कोटींची संपत्ती आहे. भारतीय महिलांनी केलेली संपत्ती निर्मिती समजून घेण्याचा हा आकडेवारीवर आधारीत करण्यात आलेला प्रयत्न आहे आणि या निमित्ताने भारतातील आघाडीच्या १०० उद्योजक, प्रोफेशनल्स आणि व्यावसायिक महिलांच्या यशाचा सन्मान करण्यात आला आहे. या यादीतील महिलांची सरासरी संपत्ती २७२५ कोटी इतकी आहे. या आहेत भारतातील सर्वाधिक
क्रमांक नाव संपत्ती कंपनी निवास
रोशनी नाडार-मल्होत्रा ५४,८५० एचसीएल टेक्नॉलॉजीस नवी दिल्ली
किरण मुझुमदार-शॉ ३६,६०० बायोकॉन बंगळुरू
लीना गांधी-तिवारी २१,३४० यूएसव्ही मुंबई
निलीमा मोतापर्ती १८,६२० डिव्हीज लॅब हैदराबाद
राधा वेम्बु ११,५९० झोहो चेन्नई
जयश्री उलाल १०,२२० ऍरिस्टा नेटवर्क सॅन फ्रान्सिस्को
रेणु मुंजाळ ८,६९० हिरो मोटो कॉर्प नवी दिल्ली
मलिका चिरायु अमीन ७,५७० अलेम्बिक फार्मा वडोदरा
अनु आगा आणि मेहेर पदमजी ५,८५० थरमॅक्स पुणे
१० फाल्गुनी नायर अँड फॅमिली ५,४१० नायका मुंबई