अल्पवयीन मुलगी शेतावर जात होती, इतक्यात चौघे जण तिथे आले अन्... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, December 20, 2020

अल्पवयीन मुलगी शेतावर जात होती, इतक्यात चौघे जण तिथे आले अन्...

https://ift.tt/2Wx7bDK
हापुड: उत्तर प्रदेशच्या हापुडमधील गढमुक्तेश्वर येथून १३ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर करण्यात आला. पीडित मुलगी शेतावर जात असताना चौघे तेथे आले. त्यांनी फरफटत ऊसाच्या शेतात नेले आणि तिथे तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. तिला बेशुद्धावस्थेत तिथेच सोडून आरोपी फरार झाले. ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत तिघांना अटक केली आहे. त्यांची चौकशी केली जात आहे. घटनेनंतर बराच वेळ मुलगी बेशुद्धावस्थेत शेतात पडली होती. कुटुंबीयांनी तिचा शोध घेतल्यानंतर ती ऊसाच्या शेतात सापडली. तिला या अवस्थेत पाहून तिच्या भावाच्या पायाखालची वाळूच सरकली. भावाने पीडितेला घरी आणले. पीडिता शुद्धीवर आल्यानंतर तिने आपबीती सांगितली. त्यानंतर कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन न्याय मिळवून देण्याची मागणी केली. चौघांविरोधात गुन्हा, तिघांना अटक घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करून चौघांविरोधात गुन्हा दाखल केला. पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर आरोपींचा संपूर्ण रात्रभर शोध घेतला. चौघांपैकी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे.