नवी दिल्ली: ऑस्ट्रेलियाविरुद्ध एडिलेड येथे झालेल्या डे-नाइट कसोटीत भारतीय संघाची फलंदाजी अतीशय खराब झाली. ही कामगिरी इतकी खराब होती की कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारतीय संघाची सर्वात निचांक धावसंख्या भारताने केली. त्यानंतर भारताचा आठ विकेटनी पराभव झाला. ऑस्ट्रेलियाने चार सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली असून पुढील तीन सामन्यासाठी विराट कोहली आणि मोहम्मद शमी हे दोन खेळाडू उपलब्ध असणार नाहीत. अशा परिस्थितीत भारतीय संघा पुढील आव्हान आणखी वाढणार आहे. वाचा- मालिकेतील पुढील सामन्यांसाठी भारतीय संघाला माजी कर्णधार यांनी एक सल्ला दिला आहे. वेंगसरकरांच्या () मते बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीने महान फलंदाज ()ला तातडीने ऑस्ट्रेलियाला पाठवले पाहिजे. द्रविड सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख आहे. वाचा- बीसीसीआयने ऑस्ट्रेलियात असलेल्या भारतीय संघाची मदत करण्यासाठी राहुल द्रविडला पाठवले पाहिजे. ऑस्ट्रेलियातील परिस्थितीत चेंडू कसा खेळावा, याबाबत राहुल द्रविड शिवाय अन्य कोणीही चांगले मार्गदर्शन करू शकणार नाही. त्याच्या उपस्थितीत भारतीय फलंदाज नेट्समध्ये चांगला सराव करू शकतील. एनएससी गेल्या ९ महिन्यांपासून करोनामुळे बंद आहे. त्यामुळे त्याने हे काम करावे. बोर्ड राष्ट्रीय संघाच्या मदतीसाठी राहुल द्रविडचा चांगला उपयोग करू शकते. आता तर भारतीय संघाला पुढील ३ कसोटी विराट कोहलीशिवाय खेळायच्या आहेत. वाचा- राहुल द्रविडला दोन आठवडे क्वारंटाइनमध्ये रहावे लागले तरी सिडनी येथे होणाऱ्या तिसऱ्या कसोटीआधी तो नेट्समध्ये भारतीय संघाची मदत करू शकतो, असे वेंगसरकर म्हणाले. वाचा- २००३ साली राहुल द्रविडने एडिलेड कसोटीत शानदार फलंदाजी केली होती आणि भारतीय संघाला चार विकेटनी विजय मिळवून दिला होता. द्रविडने २३३ आणि ७२ धावा केल्या होत्या. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत त्याने १२३.८च्या सरासरीने ६१९ धावा केल्या होत्या. यात ३ अर्धशतक आणि एका शतकाचा समावेश होता. ऑस्ट्रेलिया द्रविडने १६ कसोटी सामन्यात ४१.६४ च्या सरासरीने १ हजार १६६ धावा केल्या आहेत.