IMD Weather Alert : गारपिट पुन्हा होणार! या जिल्ह्यांमध्ये थेट इशारा, पुढील 24 तास धोक्याचे.. - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, March 16, 2026

IMD Weather Alert : गारपिट पुन्हा होणार! या जिल्ह्यांमध्ये थेट इशारा, पुढील 24 तास धोक्याचे..

IMD Weather Alert : गारपिट पुन्हा होणार! या जिल्ह्यांमध्ये थेट इशारा, पुढील 24 तास धोक्याचे..

राज्यात मागील काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने मोठे बदल होताना दिसत आहेत. कधी उन्हाचा चटका तर कधी जोरदार पाऊस अशी स्थिती आहे. भर मार्चच्या महिन्यात राज्यात पाऊस कोसळत आहे. 20 मार्च 2026 पर्यंत राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला. पावसासोबतच विजांचा कडकडाट आणि वादळी वारेही असेल. राज्यात एकीकडे अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे तर दुसरीकडे कडाक्याचे उन्ह आहे. काही महिन्यांपासून हवामानात सतत चढउतार बघायला मिळत आहे. काल राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. काही दिवसांपूर्वीच झालेल्या पावसामुळे रब्बीच्या पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यामध्येच आज पुन्हा एकदा भारतीय हवामानाकडून पावसाचा इशारा जारी करण्यात आला.

मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात आज भारतीय हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला. मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पाऊस हजेरी लावत आहे. छत्रपती संभाजीनगर, बीड, सोलापूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, जालना या भागात आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. कोल्हापूर आणि साताऱ्यात गारपिटीसह पाऊस होण्याचा अंदाज आहे.

अकोला येथे देशातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. निफाड येथे राज्यातील नीच्चांकी तापमानाची नोंद झाली. निफाड येथे 13.3 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. मालेगाव, वाशिम, सोलापूर येथे पार 40 पास होता. धुळे जिल्ह्याचा तापमानाचा पारा 39 अंशाच्या पुढे गेला आहे. त्याचा परिणाम आता भाजीपाला विक्रेत्यांवर झाला आहे. गेल्या आठवड्यामध्ये 22 किलोच्या टमाट्याला 350 रुपये कॅरेट भाव भेटत असताना आता त्याला अवघा 150 रुपये कॅरेट भाव शेतकऱ्यांना मिळतो आहे.

सात ते आठ रुपये किलो दराने टमाटे विक्रीची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. वाढलेल्या तापमानामुळे शेतामध्ये टोमॅटो लवकर पिकत आहे. टमाट्याची आवक वाढली आहे लवकर तयार झालेला टमाटा खराब होऊ नये म्हणून शेतकरी बाजारात आणत आहेत. मात्र, त्याला अवघा सात ते आठ रुपये दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.