Corona Vaccine News: कोविशील्ड चाचणीचे 'साइड इफेक्ट', लस उशिरा येणार? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, December 2, 2020

Corona Vaccine News: कोविशील्ड चाचणीचे 'साइड इफेक्ट', लस उशिरा येणार?

https://ift.tt/36rqm7s
नवी दिल्ली: देशात तयार होत असलेल्या कोव्हीशिल्ड (Covishield) या लशीच्या साइड इफेक्ट होण्याबाबत एका स्वयंसेवकाने आरोप लावल्यानंतर आता सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया तयार करत असलेल्या लशीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले होते. मात्र, चेन्नईमध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या कोविड-१९च्या लशीच्या चाचणीत भाग घेणाऱ्या एका स्वयंसेवकाला काही कथित समस्या जाणवल्यानंतर सुरुवातीचे निष्कर्ष लक्षात घेता हे परीक्षण रोखण्याची आवश्यकता नव्हती असे सरकारने म्हटले आहे. या बरोबरच या घटनेचा लस येण्याच्या वेळेवर कोणताही परिणाम होणार नाही असेही सरकारने स्पष्ट केले आहे. (what is the ?) दावा तपासून पाहिला जात आहे- केंद्र सरकार सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाने केलेल्या चाचणीदरम्यान आलेल्या समस्येची तपासणी ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) करत आहे. घडलेली घटना आणि दिलेला डोस यात काही संबंध आहे का हे या तपासणीदरम्यान पाहिले जाणार आहे. गेल्या आठवड्यात चेन्नईमध्ये कोव्हीशील्ड लशीच्या चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात ४० वर्षीय व्यक्तीने आपल्यावर साइड इफेक्ट झाल्याची तक्रार केली होती. त्यानंतर त्या व्यक्तीने ही चाचणी रोखण्याची मागणी केली. तसेच ५ कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्याचीही मागणी केली होती. लशीच्या साइड इफेक्टचा दावा SII ने फेटाळला हे आरोप फेटाळून लावताना आरोप दुर्दैवी आणि खोटे असल्याचे SII ने म्हटले आहे. ती व्यक्ती शंभर कोटींचाही दावा करेल असे SII ने म्हटले आहे. ही लस सुरक्षित आणि संरक्षण करणारी असल्याचेही कंपनीने म्हटले आहे. क्लिक करा आणि वाचा- जो पर्यंत ही लस सुरक्षित आणि संसर्गापासून संरक्षण करणारी आहे याची खात्री पटत नाही, तो पर्यंत ही कोणालाही दिली जाणार नाही, असे कंपनीने म्हटले आहे. साइड इफेक्टच्या मुद्द्याबाबत रिपोर्ट करण्यासाठी योग्य त्या प्रक्रियेचे पालन केले गेले असल्याचे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना म्हटले आहे. हे प्रकरण न्यायालयात असल्याने आम्ही सविस्तर टिप्पणी करू शकणार नाही, असेही त्यांनी सांगितले. क्लिक करा आणि वाा- क्लिक करा आणि वाचा-