काँग्रेस आमदाराच्या हत्येचा रचला कट, त्याआधीच... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, January 24, 2021

काँग्रेस आमदाराच्या हत्येचा रचला कट, त्याआधीच...

https://ift.tt/39eatTw
धौलपूर: राजस्थानमधील पोलिसांनी शुक्रवारी जिल्ह्यातील बाडी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी चार जणांना अटक केली आहे. अटक केलेल्यांपैकी एक जण १ लाखांचा 'इनाम' असलेला कुख्यात दस्यु केशव गुर्जर याचा सख्खा भाऊ आणि अन्य तीन जण हे मावस भाऊ असल्याची माहिती मिळाली आहे. चारही आरोपींनी गुर्जरच्या सांगण्यावरून २६ जानेवारीला आमदार मलिंगा यांच्या हत्येचा कट रचला होता. चारही आरोपींना तंत्रज्ञानाच्या मदतीने धौलपूर पोलिसांनी राजाखेडा परिसरात घेराव घालून पकडले. आरोपींची कसून चौकशी केली जात आहे. त्यातून महत्वाची माहिती हाती लागू शकते, असा पोलिसांचा अंदाज आहे. धोलपूरचे पोलीस अधीक्षक केशर सिंह शेखावत यांनी सांगितले की, अटक केलेले सर्व आरोपी हे २६ जानेवारीला जिल्ह्यात हत्याकांड घडवून आणणार होते. त्यात काँग्रेस आमदार मलिंगा यांच्या हत्येचा कटही आरोपींनी रचला होता. दरोडेखोर केशवचा लहान भाऊ आणि तीन मावस भावंडांनी मलिंगांच्या हत्येचा कट रचला होता. पोलिसांनी सायबर पोलिसांच्या मदतीने त्यांची माहिती मिळवली आणि लोकेशनच्या आधारे राजाखेडा परिसरातून त्यांना अटक केली.