'कोंकणाचा तुला सोडण्याचा निर्णय बरोबर', रणवीरनं दिलं मजेशीर उत्तर - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, February 19, 2021

'कोंकणाचा तुला सोडण्याचा निर्णय बरोबर', रणवीरनं दिलं मजेशीर उत्तर

https://ift.tt/2NCJZCE
मुंबई: अभिनेता सोशल मीडियावर बराच सक्रिय आहे. अनेकदा त्याच्या सोशल मीडिया पोस्ट आणि ट्वीट्स चर्चेचा विषय ठरतात. काही दिवसांपूर्वीच त्यानं पर्यावरण कार्यकर्ती दिशा रविबाबत एक ट्वीट केलं होतं. त्यांच्या या ट्वीटवर अनेक युझर्सच्या प्रतिक्रिया आल्या होत्या. पण एक प्रतिक्रिया अशी होती जी खूप चर्चेत राहिली. एका युझरनं त्याच्या या ट्वीटवरून त्याला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला पण मजेदार अंदाजात उत्तर देत रणवीरनंही त्याची बोलती बंद केली. रणवीर दिशा रवि हिच्याबाबत ट्वीट करताना लिहिलं, 'विद्यार्थ्यांना राजकारणापासून दूर ठेवणं चांगली गोष्ट आहे.' रणवीरच्या या ट्वीटवरून एका युझरनं त्याच्या खासगी आयुष्यावर कमेंट केली होती. या युझरनं लिहिलं, 'कोंकणाचा तुला सोडण्याचा निर्णय बरोबर होता.' युझरच्या या कमेंटवर रणवीरनं खूपच मजेदार अंदाजात उत्तर दिलं. त्यानं या युझरनं लिहिलं, 'नाही नाही कदाचित मी बरोबर होतो आणि ती मला सोडून गेली.' रणवीर शौरी आणि त्या युझरमधील हे संभाषण सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. रणवीर शौरी आणि यांचं २०१०मध्ये लग्न झालं होतं. मात्र लग्नानंतर अवघ्या ५ वर्षांनीच या दोघांनी घटस्फोट घेतला होता. या दोघांना एक मुलगा सुद्धा आहे. नुकतंच रणवीरला करोनाचं निदान झालं असून त्यानं स्वतःला क्वारंटाइन करत याची माहिती ट्विटरवरून चाहत्यांना दिली होती.