
नवी दिल्ली : उत्तराखंडच्या जिल्ह्यातील तपोवन भागात हिमनदी फुटल्यानं घडलेल्या दुर्घटनेतील बाधितांच्या मदतीसाठी भारतीय हवाईदलाकडूनही मदत पुरवण्यात येतेय. नदीच्या पाण्याच्या प्रवाहात अचानक वाढ आल्यानं झालेल्या जलप्रलयात अनेक भागांचं मोठं नुकसान झाल्याचं दिसून येतंय. जवळपास १३ गावांचा संपर्क अजूनही तुटलेला असल्याचं समोर येतंय. त्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून या भागात हेलिकॉप्टरच्या मदतीनं धान्याची पाकिटं नागरिकांना पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रविवारीच अशी धान्याची पाकिटं तयार करण्याच्या कामालाही सुरुवात करण्यात आली होती. वाचा : ची तीन हेलिकॉप्टर मदतीसाठी आणि भारतीय हवाईदलाला संयुक्त रुपात बचावकार्य मोहिमेची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानंतर भारतीय हवाईदलाकडून तीन हेलिकॉप्टर मदतीसाठी धाडण्यात आले आहेत. यामध्ये दोन 'एमआय १७' आणि एका 'एएलएच ध्रव' या हेलिकॉप्टरचा समावेश आहे. रविवारी सकाळी रेस्क्यू ऑपरेशनसाठी भारतीय हवाईदलाकडून हे तीन्ही हेलिकॉप्टर 'डिझास्टर रिलीफ टीम'सोबत देहरादूनहून जोशीमठासाठी रवाना करण्यात आले आहेत. कर्मचाऱ्यांना केलं एअरलिफ्ट भारतीय हवाईदलाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, गरज पडल्यास आणखी विमानांना मदतीसाठी तैनात करण्यात येईल. रविवारी दुपारीच हवाईदलाच्या जवानांनी एनडीआरएफच्या टीमला बचावकार्यात मदत पुरवणं सुरू केलं होतं. हवाईदलाच्या सी १३० आणि एएन ३२ या एअरक्राफ्टच्या मदतीनं जॉली ग्रान्ट विमानतळाहून एनडीआरएफ कर्मचाऱ्यांना एअरलिफ्ट करण्यात आलं. भारतीय हवाईदलाकडून रविवारी सायंकाळी हिंडनहून सी १३० द्वारे ६० जवानांसहीत पाच टनांचा भार एअरलिफ्ट करण्यात आला. बचावकार्यासाठी भारतीय लष्कर, एसडीआरएफ, आयटीबीपी आणि भारतीय वायुसेनेसहीत इतरही सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आलीय. रविवारी हिमनदी फुटल्याचं समजताच आयटीबीपी, एनडीआरएफ आणि एडीआरएफची टीम बचावकार्यात सक्रीय झाली होती. तर हवाईदलाला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले होते.