
नवी दिल्ली: देशातील शेतकरी आंदोलनाला () परदेशातील अनेकांनी पाठिंबा दिल्यानंतर भारतातील सिनेस्टार, खेळाडू आणि अन्य प्रसिद्ध व्यक्तींनी यासंदर्भात जाहीरपणे मते मांडली होती. यामध्ये मास्टर ब्लास्टर ()चा देखील समावेश होता. पण सचिनने देशाच्या सार्वभौमत्वबद्दल मत व्यक्त केल्यानंतर अनेकांनी त्याच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. राजधानी दिल्लीत आणि परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून करत आहेत. केंद्र सरकारने आणलेल्या नव्या कृषी कायद्याला शेतकरी विरोध करत आहेत. या आंदोलनाला पॉप स्टार रिहानासह जगभरातील अन्य काही लोकांनी पाठिंबा दिला होता. भारताच्या अंर्गतग गोष्टीत लक्ष घालण्याची गरज नाही, असे उत्तर अनेकांनी सोशल मीडियावरुन दिले. वाचा- सचिन तेंडुलकरने देशाच्या सार्वभौमत्वाशी कधीच तडजोड मान्य केली जाणार नाही. परदेशातील लोक बघ्याची भूमिका घेऊ शकतात. पण ते हस्तक्षेप करू शकत नाही. भारतीय लोकांना या देशाबद्दल अधिक माहिती आहे आणि त्यांनीच निर्णय घ्यायला हवा. देश म्हणून आपण सर्वांनी एकत्र राहिले पाहिजे. सचिनच्या या ट्विटवरून अनेकांनी त्याच्यावर टीका केली. सचिनवर टीका करणाऱ्यांना उत्तर देताना एका भारतीय युझरने रशियाची टेनिसपटू ()ची माफी मागितली आहे. आता सचिनच्या ट्वीटचा आणि मारियाचा काय संबंध असा तुम्हाला प्रश्न पडले. मारियाने २०१५ साली एका मुलाखतीत सचिन तेंडुलकरला ओळखत नसल्याचे म्हटले होते. तेव्हा भारतीय लोकांनी तिच्यावर बरीच टीका केली होती. वाचा- आता एका भारतीय युझरने तिची त्या घटनेबद्दल माफी मागितली आहे. या युझरच्या मते, तू जेव्हा सचिनला ओळखत नाही असे म्हणाली होतीस तेव्हा आम्ही तुझ्यावर टीका केली होती. पण आता हे सिद्ध झाले आहे की सचिन विषयी एखाद्याला माहिती नसावी. तू बरोबर होतीस, आम्ही तुझी माफी मागतो. आम्ही ज्या पद्धतीने तुझ्याशी वागलो यासाठी... तू बरोबर होती, आम्हाला माहिती नाही की सचिन कोण आहे.