बीजिंग: करोनाच्या संसर्गामुळे जगभरात बदनामीचा सामना करावा लागलेल्या आणि आक्रमक विस्तारवादी भूमिकेमुळे जगातील देशांसाठी खलनायक ठरलेल्या चीनने आपली प्रतिमा सुधरवण्यासाठी वॅक्सिन डिप्लोमसी सुरू केल्याची चर्चा आहे. चीनने देशातील लसीकरणापेक्षा अधिक लशी इतर देशांमध्ये पाठवल्या आहेत. हाँगकाँगमधील 'साउथ चायना मॉर्निंग पोस्ट'ने दिलेल्या वृत्तानुसार, चीनने सोमवारपर्यंत तयार झालेल्या कमीत ४.६ कोटी लशी अथवा लसीकरणाशी निगडीत साहित्य जगभरात पाठवल्या आहेत. त्याशिवाय आणखी काही लाखो डोस पाठवण्यात येणार आहेत. देशातील आरोग्य प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, चीनमध्ये ९ फेब्रुवारीपर्यंत ४.५ कोटी लशीचे डोस देण्यात आले. तर, अमेरिकेत हीच संख्या पाच कोटींहून अधिक आहे. चीनने काही दिवसांमध्ये लाखो करोना चाचणी केली होती. वाचा: 'साउथ चायना मॉर्निंग पोस्ट'ने दिलेल्या चीनने चिनी नवीन वर्षाच्या आधी पाच कोटी लोकांना लस टोचण्याचे उद्दिष्ट असल्याचे म्हटले होते. मात्र, प्रत्यक्षात हा आकडा गाठण्यास चीनला अपयश आले आहे. चीनमध्ये नवीन वर्ष आणि वसंत महोत्सवाच्या निमित्ताने ११ ते १८ फेब्रुवारीपर्यंत सुट्टी आहे. चीनच्या देशातंर्गत लशीकरणातही अडथळे निर्माण झाले आहेत. यामध्ये लस पुरवठ्यापासून लसीकरणात लोकांकडून होणारी टाळाटाळ, लशीचा कमी परिणामकता आदी मुद्यांचाही लसीकरण मोहिमेवर परिणाम होत आहे. वाचा: दरम्यान, लशीच्या गुणवत्तेवरून चीन आणि अमेरिका, पाश्चिमात्य देशांमध्ये जुंपली होती. दोन्ही बाजूंनी लशीची सुरक्षिता आणि प्रभावीपणा यावर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. अमेरिकेतील माध्यमांमध्ये प्रकाशित झालेल्या एका वृत्तानुसार, चीनने विकसित केलेली लस ही फायजर आणि मॉडर्नाच्या लशीइतकी प्रभावी नाही. ब्राझील आणि तुर्कीनेही लस पुरवठा धीम्या गतीने होत असल्याबद्दल चीनवर नाराजी व्यक्त केली. लस गुणवत्तेबाबत सुरू असलेला वाद सध्या तरी माध्यमांमध्येच सुरू होता. वाचा: जवळपास २४ हून अधिक देशांनी चीनसोबत करोना लशीसाठी करार केले आहेत. यातील बहुतांशी देश विकसनशील आणि गरीब आहेत. श्रीमंत आणि विकसित देशांनी फायजर व मॉडर्नाची लस वापरावर भर दिला आहे. चीनने विकसित केलेल्या लशीविरोधात पाश्चिमात्य देशांमधून दिशाभूल आणि खोट्या बातम्या प्रसारीत होत असून आमच्या विरोधातील प्रचाराचा व्यापक कट असल्याचे चीनने म्हटले.