पार्टीनंतर बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची भोसकून हत्या, चार जणांना अटक - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, February 12, 2021

पार्टीनंतर बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची भोसकून हत्या, चार जणांना अटक

https://ift.tt/3b0t0C7
नवी : दिल्लीच्या भागात एका २४ वर्षीय व्यक्तीची चाकू भोसकून हत्या करण्यात आलीय. या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना अटक केलीय. मृताचं नाव रिंकू शर्मा असल्याचं समजतंय. आपल्या घराजवळच एका मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीला रिंकू गेला होता. इथे त्याचा आरोपींसोबत अगदी झाला. त्यानंतर त्याची चाकू भोसकून हत्या करण्यात आली. आरोपींची नावं मेहताब, दानिश, जाहिद आणि इस्लाम अशी असल्याचं समजतंय. मृताच्या कुटुंबीयांचा दावा मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुण हा बजरंग दलाचा कार्यकर्ता होता. तसंच ५ ऑगस्ट २०२० रोजी रिंकूनं राम मंदिर उभारलं जाण्याच्या आनंदात या भागातून श्री राम रॅली काढली होती. यावेळेसही आरोपी पक्षाकडून आक्षेप घेण्यात आला होता. रिंकू जय श्री रामच्या घोषणा देत असल्यानंच त्याची हत्या करण्यात आली, असा आरोप रिंकूच्या कुटुंबीयांकडून करण्यात आलाय. रिंकू बजरंग दलाशी निगडीत होता तसंच मंगोलपुरी भागात हनुमान चालिसा प्रमुख होता. रिंकूला मारहाण होत असतानाही तो 'जय श्री राम'च्या घोषणा देत होता, असं रिंकूची आई राधा शर्मा यांनी म्हटलंय. धार्मिक मुद्दा समोर आलेला नाही : पोलीस पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिंकू शर्मा पार्टीला गेला असताना तिथे त्याचा काही जणांसोबत वाद झाला. तो घरी आल्यानंतर हल्लेखोरांनी त्याच्यावर चाकू हल्ला केला. या प्रकरणात चार जणांना अटक करण्यात आली आहे. प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, चौकशीत अद्याप कोणताही धार्मिक मुद्दा समोर आलेला नाही. धंद्यात नुकसानीचा मुद्दा मृत व्यक्ती आणि आरोपींनी मिळून रोहिणी भागात एक रेस्टॉरन्ट उघडलं होतं. या धंद्यात मात्र त्यांना मोठं नुकसान सहन करावं लागलं होतं. त्यानंतर त्यांचे एकमेकांत वादही झाले होते, अशी माहितीही पोलिसांनी दिलीय.