IPL 2021 लिलाव; या भारतीय खेळाडूला बसला झटका - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, February 12, 2021

IPL 2021 लिलाव; या भारतीय खेळाडूला बसला झटका

https://ift.tt/3u1eaEq
नवी दिल्ली: सात वर्षाच्या बंदीनंतर क्रिकेट मैदानावर परतलेल्या एस ( )ला एक मोठा झटका बसला आहे. गेल्या महिन्यात बीसीसीआयने आयोजित केलेल्या सैय्यद मुश्ताक अली टी-२० ट्रॉफीत श्रीसंतने केरळचे प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर त्याने आयपीएलच्या १४व्या हंगामाच्या लिलावासाठी देखील अर्ज केला होता. पण खेळण्याच्या श्रीसंतच्या स्वप्नांना मोठा धक्का बसला आहे. आयपीएल २०२१साठीचा मिनी लीलाव येत्या १८ फेब्रुवारी रोजी चेन्नईत होणार आहे. या लिलावाच्या अंतिम यादीत स्थान मिळवण्यात श्रीसंतला अपयश आले. २०१३ आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी श्रीसंतवर बंदी घातील होती. न्यायालयीन लढाईत त्याची बंदी सात वर्ष करण्यात आली. आयपीएलच्या लिलावासाठी श्रीसंतने नाव नोंदणी केली होती. त्याने स्वत:ची बेस प्राइस ७५ लाख इतकी ठेवली होती. याआधी किंग्स इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्सकडून आयपीएलमध्ये भाग घेतलेल्या श्रीसंत टीम इंडियाच्या २००७ आणि २०११च्या विजेत्या संघात होता. पण या वर्षी आयपीएल लिलावाच्या खेळाडूंच्या अंतिम यादीत त्याचा समावेश करण्यात आलेला नाही. सात वर्षानंतर मैदानावर आलेला श्रीसंत आता ३८ वर्षाचा आहे. पण त्याने अद्याप फिटनेस मिळवलेला नाही. या शिवाय त्याची फिल्डिंग ही देखील चिंतेचा विषय आहे. टी-२० क्रिकेटमध्ये फिल्डिंग ही महत्त्वाची ठरते. या कारणामुळेच बीसीसीआयने आयपपीएलच्या अंतिम यादीत त्याला जागी दिली नाही. सैय्यद मुश्ताक अली स्पर्धेतील पाच सामन्यात श्रीसंतला छाप टाकता आली नाही. पाच सामन्यात त्याला फक्त ४ विकेट मिळाल्या. दोन सामन्यात त्याला एकही विकेट मिळाली नाही. इतक नव्हे तर श्रीसंतच्या गोलंदाजीत आता पूर्वीसारखी धार राहिली नाही.