
म. टा. प्रतिनिधी, मुंबई मर्यादित वेळेत धावत असल्याने मोठ्या प्रमाणात नोकरदार वर्ग एसटी आणि खासगी गाडीनेच प्रवास करत आहे. वाढत्या इंधनदरामुळे सामान्यांचे कंबरडे मोडलेले असतानाच आता एसटी भाडेवाढीचा मारही प्रवाशांना सहन करावा लागण्याची शक्यता आहे. परिवहनमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आज, मंगळवारी होणाऱ्या बैठकीत भाडेवाढीवर अंतिम निर्णय होणार आहे. फेब्रुवारी २०२०मध्ये डिझेल ६६ रुपये प्रति लिटर होते. फेब्रुवारी २०२१ मध्ये हाच दर ७९ रुपयांपर्यंत पोहोचला. सध्या एसटी महामंडळाला रोज ९ लाख लिटर डिझेल लागते. डिझेल दरात १३ रुपयांची वाढ झाली. यामुळे एसटी महामंडळाला मागील वर्षीच्या तुलनेत रोज १ कोटी रुपयांचा अतिरिक्त भार सहन करावा लागत आहे, असे एसटीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. वाचा: एसटीचा संचित तोटा ५,००० कोटी रुपयांच्या पुढे गेला आहे. लॉकडाउन काळात महामंडळाचे झालेले आर्थिक नुकसान, डिझेलची देणी यांचा एकत्रित विचार केल्यास महामंडळाचा तोटा आणखी १००० कोटींनी वाढण्याचा अंदाज आहे. उत्पन्नवाढीसाठी आगामी काही काळ भाडेवाढ करावी लागेल. मात्र, ती नेमकी किती असेल याबाबत संचालक मंडळातील बैठकीत निर्णय घेण्यात येईल. त्याचबरोबर एसटीत 'बदलणारे (फ्लेक्सी) तिकीटदर'ही लागू करण्यापूर्वी कायदेशीर बाजू तपासण्यात येत आहेत. वाचा: महामंडळातील सुमारे तीन हजारहून अधिक गाड्यांचे आयुष्य पूर्ण झाले आहे. महामंडळासाठी दोन हजार नवीन गाड्या घेण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पातही तरतूद करण्यात आली आहे. मात्र, करोनामुळे राज्य सरकारनेही सर्व विभागांतील खर्चात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे महामंडळासाठी देण्यात येणाऱ्या निधीतही कपात करण्यात येणार असल्याचे एसटीतील अधिकाऱ्यांनी सांगितले. वाचा: