नगर: माजी सरपंच-ग्रामसेवकानं स्वतःच्याच नावांनी १०६ वेळा चेक काढले! - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, February 28, 2021

नगर: माजी सरपंच-ग्रामसेवकानं स्वतःच्याच नावांनी १०६ वेळा चेक काढले!

https://ift.tt/3dSTwAL
म. टा. प्रतिनिधी, : तालुक्यातील येथील तत्कालीन सरपंचाने ग्रामसेवकाला हाताशी धरून आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात दोघांनी मिळून तब्बल १०६ वेळा स्वतःच्याच नावाने धनादेश काढले. त्यातून विविध सरकारी योजनांतील सुमारे २६ लाख रुपयांचा केला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर माजी सरपंच व सध्याचे उपसरपंच प्रशांत गवराम फटांगरे व ग्रामसेवक सुनील शंकर शेळके यांच्याविरोधात घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वत:च्या नावाने चेकने पैसे काढून अपहार करण्याचा वेगळाच नमुना या गावात पाहायला मिळाला. हा प्रकार २०१२ ते २०१३ ते २०१७ ते २०१८ या काळात घडला. याची कुणकुण लागल्याने एका दक्ष ग्रामस्थाने जानेवारी २०२० मध्ये तक्रार केली. त्यानुसार या प्रकाराची चौकशी सुरू झाली. गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी नोटीसा पाठविल्या. सरपंचाने नोटीसांकडेही दुर्लक्ष केले. ग्रामसेवकाने मात्र उत्तर दिले. चौकशी समिती नेमून चौकशी करण्यात आली. गटविकास अधिकाऱ्यांना चौकशीचा अहवाल सादर करण्यात आला. त्यातून या दोघांनी केलेला अपहार उघड झाला. ग्रामपंचायतीचा निधी खर्च करण्यासाठी पद्धत ठरलेली आहे. त्या सर्वांना फाटा देत या दोघांनी वेळोवळी स्वत:च्या नावाने धनादेश देऊन निधी उचलला असल्याचे आढळून आले. फटांगरे यांनी तब्बल ८२ वेळा, तर ग्रामसेवक शेळके यांनी २४ वेळा आपल्या नावाने चेकद्वारे ग्रामपंचायतीच्या खात्यातून पैसे काढल्याचे आढळून आले. सरपंच फटांगरे यांनी सुमारे साडेसोळा लाख तर ग्रामसेवक शेळके यांनी सुमारे ९ लाख रुपये अशा पद्धतीने काढल्याचे आढळून आले. या प्रकरणी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सुनील गुलाबराव माळी यांनी घारगाव पोलीस ठाण्यात सारोळे पठारचे तत्कालीन सरपंच तथा विद्यमान उपसरपंच प्रशांत फटांगरे व ग्रामसेवक सुनील शेळके या दोघांविरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी त्या दोघांविरूद्ध फसवणूक व अपहार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे. आता शेळके यांच्या पदासंबंधी पंचायत समितीकडून काय कारवाई केली जाते, याकडेही लक्ष लागले आहे.