
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 'मन की बात' च्या ( ) माध्यमातून देशवासियांना संबोधित करतील. 'मन की बात'चा हा ७४ वा भाग आहे. पीएम मोदी यांनी शनिवारी ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. ंची रेडिओशिवाय ट्विटर हँडल, फेसबुक पेज आणि मोदी अॅपद्वारे 'मन की बात' कार्यक्रम ऐकू येऊ शकतो. हा कार्यक्रम प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारित केला जातो. वाचा अपडेट्स... - भारतात अनेक भाषा आहे. या भाषा आपली संस्कृती आणि अभिमानाचे प्रतीक आहेः पंतप्रधान मोदी - तमिळ ही सुंदर भाषा आणि जगभर लोकप्रिय आहे. तमिळ साहित्याचा उच्च दर्जा आणि कवितांबद्दल बऱ्याच जणांना आपल्याला माहिती दिलीः पंतप्रधान मोदी - जगातील सर्वात प्राचीन भाषा तमिळ शिकण्याचा मी फारसा प्रयत्न केला नाही. मी तमिळ शिकू शकलो नाही, ही माझी एक कमतरता राहिलीः पंतप्रधान मोदी - जेव्हा प्रत्येक भारतीयाला अभिमान होतो, तो मोहीमेत सहभागी होतो. आत्मनिर्भर भारत एक आर्थिक अभियान न राहता राष्ट्रीय प्रेरणा बनतेः पंतप्रधान मोदी - स्वदेशी वस्तूंवर आणि आपल्या देशातील वस्तूंवर अभिमान करणं ही आत्मनिर्भर भारताची पहिली अट आहेः पंतप्रधान मोदी - स्वावलंबी भारत अभियानात विज्ञानाचे मोठे योगदान आहे. स्वावलंबी भारत म्हणजे आपल्या भविष्य आपण घडवणंः पंतप्रधान मोदी - आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी इतरांवर अवलंबून राहू नये. जे आहे तसंच सुरू ठेवण्याच्या बाजून संत रविदास नव्हते. देशाचे तरुणही रविदास यांच्या विचाराने प्रेरीत आहेः पंतप्रधान मोदी - संत रविदास यांचे जन्मस्थान वाराणसीत आहे. संत रविदास यास यांचे अध्यात्म आणि त्यांची ऊर्जा आपण त्यांच्या तिर्थ स्थळावर अनुभवली आहे- पंतप्रधान मोदी - कल्पकतेतून शेती करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांचा मोदींनी केला उल्लेख - आज राष्ट्रीय वैज्ञानिक दिवस असल्याचं सांगत पंतप्रधान मोदींनी डॉ. सी. व्ही. रमण यांचे केले स्मरण - यंदा हरिद्वारमध्ये कुंभमेळा होत आहे. पाणी आपल्यासाठी जीवन आहे, श्रद्धा आणि विकासाचा एक प्रवाह आहे- पंतप्रधान मोदी - पाणी हे आपल्यासाठी जीवन आणि श्रद्धा आहे - माघ पौर्णिमेचा उल्लेख करत पंतप्रधान मोदी म्हणाले- आपल्या देशात पाण्याशी संबंधीत अनेक उत्सव होतात